ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती

पुणे परिमंडळांतर्गत पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राज्य क्षयरोग व नियंत्रण केंद्र पुणे, आरोग्य व कुटूंब प्रशिक्षण केंद्र औंध पुणे करीता रिक्त पदांची भरती प्रक्रिया करणेसाठी खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती – NHM Pune Recruitment 2022:

एकूण जागा: 78 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 बालरोगतज्ञ 05
2 वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 22
3 स्टाफ नर्स 42
4 स्त्रीरोगतज्ञ 02
5 भूलतज्ञ 02
6 समुपदेशक 02
7 लेखापाल 02
8 सांख्यिकी सहाय्यक 01
एकूण जागा 78

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD/DNB
  2. पद क्र.2: MBBS
  3. पद क्र.3: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
  4. पद क्र.4: MD/DNB
  5. पद क्र.5: MD/DA/DNB
  6. पद क्र.6: (i) MSW   (ii) 01 वर्ष अनुभव
  7. पद क्र.7: (i) B.Com   (ii) Tally   (iii) MSCIT
  8. पद क्र.8: (i) सांख्यिकी किंवा गणितात पदवी  (ii) MSCIT

वयाची अट: 

  1. पद क्र. 1, 2, 4 आणि 5 : 70 वर्षांपर्यंत
  2. पद क्र. 3, 6, 7  आणि 8:  18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

फी: 150/-

नोकरी ठिकाण: पुणे आणि PCMC

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑक्टोबर 2022  (05:00 PM)

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अटी व शर्ती :

१) इच्छुक उमेदवारांनी दि. ११/१०/२०२२ ते १९/१०/२०२२ रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. ज्या ठिकाणी (जाहिरातीत दिलेले पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र पुणे, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र औंध पुणे) दिलेले आहे ते अर्जासोबत स्पष्ट करावे १) वयाचा पुरावा २) पदवी / पदवीका प्रमाणपत्र (वरील तक्त्याप्रमाणे) ३) शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका ४) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (as applicable) ५) शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये National Health Mission मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ६) निवासी पुरावा ७) जातीचे प्रमाणपत्र ८ ) उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटोसह सोबत जोडलेल्या ऑनलाईन लिंक http://ddhspune.com/ वर जाऊन अर्ज सादर करावा.

२) अर्जासोबत उमेदवारांनी परिक्षा शुल्क रक्कम रु.१५०/- रुपयांचा डिमांड ड्राफट Deputy Director Health Services Pune यांच्या नावे पोस्टाने, कुरियरने अथवा व्यक्तिशः मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, एनएचएम विभाग, कौन्सिल हॉल समोर, पुणे १ येथे विहित मुदतीत सादर करावा. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून इतर दिवशी सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत)

तसेच अर्ज ऑनलाईन भरताना डिमांड ड्राफ्टचा फोटो, बँकेचे नाव व डिमांड ड्राफटच्या मागच्या बाजूला पदाचे नाव अर्ज क्रमांक, उमेदवाराचे संपूर्ण नाव मोबाईल नंबर अचूक लिहावे.

३) सदरचे पदे ११ महिन्याच्या कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत.

४) जर या आधी उमेदवाराने राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये काम केले असेल तर वयोमर्यादेमध्ये ५ वर्षे मिथिल करण्यात येतील.

(५) पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मानधन असुन त्याव्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाहीत.

६) ऑनलाईनद्वारे प्राप्त झालेल्या अर्जावरून व उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेवरून मेरीट लिस्ट तयार करण्यात येईल. मेरीट लिस्ट तयार करताना Qualifying Exam मध्ये मिळालेले गुण उच्च शैक्षणिक अर्हता व शासकीय / निमणासकीय कार्यालयाचा अनुभव या बाबींचे गुण एकत्र करून मेरीट लिस्ट तयार करण्यात येवून संबंधित पात्र उमेदवारास मुलाखती बोलविण्यात येईल, पात्र उमेदवारांची संख्या जादा आल्यास त्यांना १५१ पदासाठी ५ पात्र उमेदवार) याप्रमाणे मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.

७) वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस तसेच विशेषतज्ञ या पदाकरिता उमेदवार दिलेल्या जाहिरातीपेक्षा कमी आले तर महिन्याच्या दुसन्या गुरुवारी थेट मुलाखती घेवून जागा भरण्यात येतील.

८) अर्जदार हा संबंधित पदासाठी शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत कोणत्याही जिल्हयातून महानगरपालिकेतून उमेदवारांवर प्रशासकीय कारणास्तव सेवासमाप्ती केली असल्यास त्या उमेदवारांचा मुलातीमधुन अपात्र केले जाईल.

९) उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरिता नमूद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग) अर्जामध्ये नमुद करावा.

१०) उपरोक्त पदांकरिता असलेल्या सर्व सूचना १) तात्पुरते पात्र / अपात्र यादी २) हरकती स्विकारणे ३) अंतिम पात्र / अपात्र यादी या बाबी राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई कडील संकेतस्थळावर https://nrhm.maharashtra.gov.in व http://ddhspune.com/ वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ पुणे कार्यालयातील नोटीस बोर्डवर वेळोवेळी दाखविण्यात येईल. तथापि, याबाबत उमेदवारास कोणतीही वेगळी सूचना अथवा दूरध्वनी एसएमएस, ई-मेल केला जाणार नाही यांची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्याकरिता उमेदवारांनी वेळोवेळी दोन्ही संकेतस्थळास / कार्यालयास भेट देणे अनिवार्य राहिल.

११) अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही, नियुक्ती दिलेल्या उमेदवारांनी मुख्यालयी राहून सेवा देणे बंधनकारक राहील.

१२) पदभरतीचे अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवाराने कार्यालयात प्रत्यक्ष भेट देवु नये, तसेच उपसंचालक कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

१३) अर्जदारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करताना त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ईमेल आयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.

१४) भरतीप्रक्रिये दरम्यान उमेदवाराने चुकीची माहिती सादर केल्याचे, कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे, दबावतंत्राचा वापर किंवा अनुचित मार्गाचा अवलंब केल्याचे आढळून आल्यास कोणत्याही टप्यावर त्याची उमेदवारी नियुक्ती कोणतीही पूर्वसूचना न देता रदद करण्यात येईल. १५) भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार पदे कमी जास्त करणे, भरती प्रक्रिया रदद करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे इ. सर्व अधिकार उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ पुणे यांनी राखुन ठेवले आहेत.