ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र रोजगार विदर्भ

पोलीस दलात १७१३० पदांच्या भरतीला ३ नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष सुरुवात

राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन- २०२१ पर्यंत रिक्त असलेल्या पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई/ वाहन चालक संवर्गातील एकूण १७१३० पदांकरीता भरती प्रक्रिया दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ पासून प्रत्यक्ष सुरुवात होत असून सदरील पोलीस भरतीची जाहिरात दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सदरील भरती प्रक्रियेत पोलीस आयुक्त कार्यालय, बृहन्मुंबई/ ठाणे शहर/ पुणे शहर/ पिंपरी चिंचवड/ मीरा भाईंदर/ नागपूर शहर/ नवी मुंबई/ अमरावती शहर/ सोलापूर शहर/ लोहमार्ग मुंबई आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, ठाणे ग्रामीण/ रायगड/ पालघर/ सिंधुदुर्ग/ रत्नागिरी/ नाशिक ग्रामीण/ अहमदनगर/ धुळे/ कोल्हापूर/ पुणे ग्रामीण/ सातारा/सोलापूर ग्रामीण/ औरंगाबाद ग्रामीण/ नांदेड/ परभणी/ हिंगोली/ नागपूर ग्रामीण/ भंडारा/ चंद्रपूर/ वर्धा/ गडचिरोली/ गोंदिया/ अमरावती ग्रामीण/ अकोला/ बुलढाणा/ यवतमाळ/ पुणे लोहमार्ग/ औरंगाबाद लोहमार्ग आदी पोलीस घटकांचा समावेश आहे. मात्र सदरील भरती प्रक्रियेत बीड/ लातूर/ उस्मानाबाद/ नंदुरबार सारख्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला दिसून येत नाही.

जाहिरात (शिपाई) पाहा