ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

तहसिल कार्यालय मुलचेरा येथे महसूल दिन साजरा

महसूल विभाग हा शासन आणि जनता यांच्यामधील दुवा तहसीलदार चेतन पाटिल

मुलचेरा:-

महसूल विभागाची नाळ ही शेतकरी तसेच ग्रामीण जनता यांच्याशी जोडलेली असल्याने हा विभाग शासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा आहे,
कोणत्याही विभागाची कोणतीही योजना राबविण्यात महसूल विभागाचे सहकार्य असते.महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे. आपल्याला वेगवेगळया माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे,त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या नागरिकांचे प्रश्न सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नियमात राहून व अभ्यासपूर्ण पध्दतीने सोडवा,असे आवाहन“ तहसीलदार चेतन पाटील यांनी केले, शासनाकडून येणाऱ्या नवनवीन योजना व प्रकल्पाचे नेतृत्व महसूल विभाग करते. कायदा सुव्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन, धान्य पुरवठा, जमिनी विषयक बाबी इत्यादी विविध कामे महसूल विभागामार्फत केली जातात. नैसर्गिक आपत्ती, निवडणूक अशा वेळी महसूल विभागातील कर्मचारी नेहमीच कार्यतत्पर असतात अशा शब्दात महसूल विभाग हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणारे आणि सर्वसामान्य नागरिकांना आपलासा वाटणारा विभाग आहे.अध्यक्षीय स्थानावरून तहसीलदार चेतन पाटिल यांनी, महसूल विभाग हे शासनाचे मध्यवर्ती विभाग म्हणून कार्यरत असून जमीन महसूल वसूल, कायदा व सुव्यवस्था राखणे या मुख्य उद्देशाने सुरू झालेल्या प्रत्येक निवडणुका, जनगणना, आर्थिक गणना, कृषी गणना, विविध सामाजिक योजना, जातीचा दाखला, अधिवास दाखला, उत्पन्न दाखला, शेतकरी दाखले ,7/12 वाटप आदी आणि शासनाकडून जे कोणतेही मोठे अभियान राबविले जाते त्याची चोख व यशस्वीपणे अंमलबजावणी करणे महसूल विभागावर असते असे म्हणत तहसीलदार चेतन पाटिल यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. 1 ऑगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून तहसील कार्याल मुलचेरा येथे तहसीलदार चेतन पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला व त्यानिमित्ताने जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र,उत्कृष्ठ कर्मचा-यांना प्रशस्तीपत्र, 7/12वाटप, महसुल प्रकरणाचे आदेश वाटप,राशन कार्ड वाटप इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन तालुका म्हणून कृषी अधिकारी विकास पाटील होते तर विशेष अतिथी म्हणून सर्वेश मेश्राम निवासी नायब तहसीलदार, जाधव साहेब उपकोशागार अधिकारी, गणेश कड पोलीस उपनिरीक्षक मुलचेरा हे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाला महसुल विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन लगाम माल चे तलाठी रितेश चिंदमवार यांनी केले.