तंत्रज्ञान ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र योजना माहिती विदर्भ

रुफटॉप सोलर योजना महाराष्ट्र 2022 : Roof Top Solar Subsidy In Maharashtra

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते.त्या योजनांपैकीच एक योजना जिसे नाव Rooftop Solar Yojana आहे.
आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत चाललेली आहे त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळश्याचा साठा सुद्धा अपुरा पडत चालला आहे. त्यामुळे पारंपरिक वीज निर्मिती साधने अपुरी पडत चाललेली आहेत त्यामुळे देशाला पुढच्या येणाऱ्या काही काळात विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकार ऊर्जा मंत्रालयाने रूफटॉप सौर प्रणाली योजना राबविण्याचा विचार केला आहे.

Rooftop Solar Yojana

या योजनेअंतर्गत घरगुती, गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना यांच्या छतावर रूफटॉप सोलर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यात येणार आहे त्यासाठी शासनाकडून 40 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल तर सौर ऊर्जेमुळे जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे महावितरणाला विकता येणार आहे त्यामुळे ग्राहकाला थोडीफार आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल या योजनेअंतर्गत घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान १ किलोवॅट क्षमतेची छतावर (रूफटॉप) सौर ऊर्जानिर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून टप्पा २ अंतर्गत वित्त सहाय्य अनुदान देण्यात येणार आहे.

विशेष सूचना: आम्ही रुफटॉप सोलर योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी व्यक्ती असतील जे रुफटॉप सोलर योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण रुफटॉप सोलर योजना काय आहे, Rooftop Solar Yojana उद्दिष्ट काय आहे, Rooftop Solar Yojana वैशिष्ट्य काय आहेत, Rooftop Solar Yojana Maharashtra फायदे काय आहेत, Solar Rooftop Yojana Maharashtra पात्रता काय आहे, Solar Rooftop Scheme आवश्यक कागदपत्रे काय आहेत, Rooftop Solar Yojana Marathi अर्ज करायची पद्धत, रुफटॉप सोलर योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

योजनेचे नाव Rooftop Solar Yojana
कोणी सुरू केली केंद्र सरकार / महाराष्ट्र शासन
लाभार्थी घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवासी संस्था,
निवासी कल्याणकारी संघटना,
गाव, पाडा, वस्ती, दुर्गम आदिवासी जमाती
लाभ छतावर सोलर बसविण्यासाठी आर्थिक सहाय्य
योजनेची सुरुवात २०१६
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन

रुफटॉप सोलर योजनेचा उद्देश

Rooftop Solar Yojana Maharashtra Purpose

  • या योजनेअंतर्गत गृहनिर्माण संस्था, निवासी संघटनांना २० टक्के अनुदान दिले जाईल.
  • रूफटॉप सोलर पॅनलमुळे मासिक घरगुती बिलात मोठी बचत होते.
  • या योजनेअंतर्गत घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • रूफटॉप सोलर पॅनल ला लावण्यात आलेल्या नेट मीटरिंगद्वारे शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे ग्राहकांकडून विकत घेतात त्यामुळे ग्राहकांना याचा थोडाफार आर्थिक लाभ मिळण्यास मदत होते.
  • पारंपारिक उर्जा स्तोत्रांवरील ताण कमी करून सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.

रूफटॉप सोलर योजनेचे वैशिष्ट्ये

Maharashtra Rooftop Solar Yojana Features

  • रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली एक अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी ४० टक्के अनुदान देण्यात येते.
  • या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आलेली आहे जेणेकरून अर्जदार आपल्या मोबाइलला च्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदारास शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
  • रुफटॉप सोलर योजनेच्या सहाय्याने राज्यातील नागरिक विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनतील.
  • राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • या योजनेअंतर्गत नागरिकांच्या विजेची बचत होईल जेणेकरून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल

महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजनेचे लाभ

Rooftop Solar System Benefits

  • या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व नागरिक घेऊ शकतात.
  • या योजनेमुळे विजेच्या बिलात कपात होते.
  • पर्यावरणाला हानी न पोहोचवता वीजेची निर्मिती करता येते.
  • निशुल्क वीजेची निर्मिती करता येते.
  • अंदाजे २५ वर्ष सोलर पॅनल चा उपयोग करून विजेची निर्मिती करता येते.
  • ५ ते ६ वर्षात योजनेअंतर्गत भरलेल्या रकमेची भरपाई होते.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी विजेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनेल.
  • सौर ऊर्जेवर विविध सुविधा उपलब्ध झाल्यामुळे खंडीत विज पुरवठयामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांतुन सुटका होईल.
  • पर्यावरण पुरक / अपारंपरीक / पुर्णनिर्मितीक्षम उर्जा चा वापर वाढेल त्यामुळे प्रदुषण मुक्त वातावरण निर्मीती होईल.
  • रूपटॉप सोलर योजनेच्या माध्यमातून तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा लाभार्थी ३० पैसे प्रतियुनिट ने विदयुत मंडळाला विकून आर्थिक लाभ मिळवता येतो.

रूफटॉप सोलर योजनेच्या अटी

Rooftop Solar Yojana Terms & Condition

  • ज्या गावात, वस्तीत, दुर्गम भागात विद्युतऊर्जा अजून पोहोचली नाही आहे अशा गावांना या योजनेअंतर्गत प्रथम प्राधान्य देण्यात येईल
  • ज्या ठिकाणी विद्युत ऊर्जा नियमित नाही म्हणजेच ज्या ठिकाणी विद्युत ऊर्जा जाते व येते अशा ठिकाणाची या योजनेअंतर्गत प्रथम निवड करण्यात येईल.
  • एखाद्या विद्युत प्रकल्पातून एक पेक्षा अधिक गावांची निवड करण्यात आली असेल तर अशा गावांना प्राधान्य क्रम देण्यात येईल.
  • गावांची निवड करते वेळेस त्या गावची प्राथमिक माहिती उदाहरणार्थ गावाचे नाव तालुक्याचे नाव, जिल्याचे नाव त्या गावची लोकसंख्या, गावातील आदिवासी जमात जनसंख्या, गावातील एकूण घरांची संख्या त्या गावात विद्युत ऊर्जेचा नियमितपणा, भौगोलिक परिस्थिती इत्यादी माहिती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत निवड करण्यात येणारे गाव, वस्ती, पाडा, वाडी हे अतिदुर्गम भागातील तसेच आदिवासी, गरीब, दारिद्र रेषेखालील असावे.
  • 1 किलोवॅट सौर ऊर्जा उपकरणाला 10 वर्ग मिटर जागेची गरज लागते.
  • एका परिवारातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
  • अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या इतर कोणत्या सोलर योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत मिळणारे वित्त सहाय्य

Rooftop Solar Yojana Maharashtra

या योजनेअंतर्गत मिळणारे रूफटॉप सोलर उपकरण घराच्या छतावर बसविण्यात येते व त्या उपकरणाच्या माध्यमातून दिवसा सौर प्रकाशातून विद्युत निर्मिती होते व निर्माण झालेल्या विजेचा उपयोग हा घरातील उपकरणांच्या (टीव्ही, पंखा, बल्ब इत्यादी) वापरासाठी केला जातो.
तसेच या सौर ऊर्जेचा उपयोग व्यावसायिक वापरासाठी सुद्धा केला जातो त्यासाठी जास्त किलोवॅट सौर ऊर्जा उपकरणाचा वापर केला जातो.

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला स्वतःकडची थोडीफार रक्कम भरावी लागते आणि बाकीची रक्कम अनुदान स्वरूपात महाराष्ट्र शासनाकडून दिली जाते.
  • घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणासाठी शासनाकडून ४० टक्के अनुदान दिले जाते.
  • ३  किलोवॅट व त्यापेक्षा अधिक १० किलोवॅट पर्यंत विद्युत निर्मिती सौर उपकरणासाठी २० टक्के अनुदान दिले जाते.
  • सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅट विद्युत निर्मिती करणारे सौर उपकरणावर २० टक्के अनुदान दिले जाते.
  • गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर २० टक्के अनुदान दिले जाते.

रूफटॉप सोलर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Rooftop Solar Yojana Documents

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • मोबाईल क्रमांक
  • अर्जदाराचे बचत बँक खाते
  • अर्जदाराच्या घराच्या मालकी हक्काची कागदपत्रे
  • अर्जदाराच्या घरातील सह-हिस्सेदारांचे संमतीपत्र
  • चालू विज बिल
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा 15 वर्ष रहिवाशी असल्याचा दाखला
  • अर्जदाराचे अलिकडल्या काळातील पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
  • रेशन कार्ड अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला.

रूफटॉप सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या यंत्रणेची किंमत खालील प्रमाणे

Solar Rooftop Yojana Maharashtra

या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रूफटॉप सौर ऊर्जा उपकरणाची 5 वर्ष देखभाल खर्चासहित करण्यात येणारी किंमत

रुफटॉप सौर ऊर्जा उपकरण किंमत 
१ किलोवॅट ४६८२०/- रुपये
१ ते २ किलोवॅट ४२४७०/- रुपये
२ ते ३ किलोवॅट ४१३८०/- रुपये
३ ते १० किलोवॅट ४०२९०/- रुपये
१० ते १०० किलोवॅट ३७०२०/- रुपये

रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत प्रति किलोवॅट किंमत जाहीर करण्यात आली आहे

Rooftop Solar Yojana Maharashtra

वरील दराप्रमाणे जर एखाद्याला ३ किलोवॅट क्षमतेचे रुफटॉप सौर सौर उपकरण बसवायचे असेल तर त्यास ३ × ४१३८० = १२४१४०/- रुपये रक्कम भरावी लागेल.

या रकमेमध्ये महाराष्ट्र शासनाचे ४० टक्के अनुदान असते.

४० टक्के अनुदान म्हणजे १२४१४० × ४० ÷ १०० = ४९६५६/-

४९६५६/- रुपये शासनाकडून या योजनेअंतर्गत वित्त सहाय्य दिले जाते.

म्हणजे ग्राहकास फक्त १२४१४० – ४९६५६ = ७४४८४/- रुपयांचा खर्च करावा लागतो.