ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

ग्रामीण भागातुनही उत्कृष्ट खेळाडू घडतील:माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे

मुलचेरा:-शहरी भागात खेळाडूंसाठी प्रशिक्षकांसह सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतात त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडू शहरी भागातील खेळाडूंच्या तुलनेत थोडे कमी पडतात.जर ग्रामीण भागातील खेळाडूंना सर्व सोयीसुविधा, योग्य प्रशिक्षण दिल्यास ग्रामीण भागातूनही उत्कृष्ट खेळाडू घडतील असे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी केले.ते मुलचेरा तालुक्यातील श्रीनगर येथे आयोजित भव्य फुटबॉल स्पर्धेचे मुख्य बक्षीस वितरक म्हणून बोलत होते.

पुढे बोलताना मुलचेरा तालुक्यातील जनतेने मला भरभरून प्रेम दिला आहे.त्यामुळेच मला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर विराजमान होता आले.अध्यक्ष पदावर असताना तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली.विशेष म्हणजे विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यातून ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करण्यात आले.यापुढेही माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली या परिसरात विकास कामे करण्याचा प्रयत्न राहील,अशी ग्वाही त्यांनी दिली.

24 ऑगस्ट पासून आदर्श स्पोर्टिंग क्लब तर्फे श्रीनगर येथे भव्य फुटबॉल स्पर्धा सुरू होती.त्यासाठी माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडून प्रथम आणि माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्याकडून द्वितीय पारितोषिक देण्यात आले.नुकतेच अंतिम सामन्यानंतर येथे प्रशांत कुत्तरमारे यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष प्रकाश दत्ता, भाजपचे अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री,सुभाष गणपती,बादल शहा,बबलू शील,विजय बिश्वास,तपन मल्लिक,सरफराज आलम, संजू सरकार,किशोर मल्लिक तसेच परिसरातील फुटबॉल प्रेमी तसेच खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.