मुलचेरा.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा) व कृषी विभागाच्या वतीने दिनांक ५ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ५ दिवसीय कोया कृषी कुंभ – २०२६ (कृषी महोत्सव) आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली येथील युवा शेतकरी श्री. संदीप कटिया मट्टामी यांना प्रगतशील शेतकरी म्हणून पुरस्कारित करण्यात आले. सदर पुरस्कार नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती करण्यासाठी मिळाला आहे. संदीप मट्टामी हे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बहुल अतिदुर्गम अशा बोलेपल्ली येथील रहिवासी आहेत. मागील ५ वर्षापासून ते नैसर्गिक, सेंद्रिय शेती करत असून इतर शेतकऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करतात. या पुरस्कार करिता त्यांनी तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी विकास पाटिल, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आकाश लवटे तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मुलचेरा चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष आभार मानले.





