ज्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत १ हजार रुपये मिळतात तसेच श्रावण बाळ योजना अंतर्गत रुपये १ हजार मिळतात अशा लाभार्थीनां आता पुढील पगार म्हणजेच १ हजार रुपये आर्थिक सहाय्य लवकरच मिळणार आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत 665 कोटी रुपये त्याच प्रमाणे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन shravan bal yojana योजनेसाठी 1194 कोटी रुपये निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना वितरीत करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
हा निधी ऑक्टोबर २०२२ या महिन्यामध्ये वितरीत करण्यात आलेला आहे.
संजय गांधी निराधार अनुदान कोणाला मिळते जाणून घ्या
संजय गांधी निराधार योजनेच लाभ मिळविण्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे.
- १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला.
- अनाथ मुले.
- दिव्यांगातील सर्व प्रवर्ग.
- क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला.
- निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतू, पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला.
- तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री.
- तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी.
- सिकलसेलग्रस्त
वरीलप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी दारिद्र रेषेमध्ये नाव असणे गरजेचे आहे किंवा कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २१ हजारांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत दारिद्रय रेषेखालील यादीच्या कुटूंबात नांव असलेल्या व २१ हजार रुपयांपेक्षा पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ किंवा ६५ वर्षावरील पात्र लाभार्थीस महिन्याला १ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
या दोन्हीही योजनांमधून लाभार्थींना प्रत्येक महिन्याला नियमित अनुदान देता यावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत ६२५ कोटी रुपये.
तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत ११९४ कोटी रुपयांचा निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना ऑक्टोबर २०२२ मध्ये वितरीत करण्यात आलेला आहे.
यामुळे नक्कीच निराधारांची दिवाळी आनंदात जाणार आहे. ज्यांना वरील दोन्ही योजनेचे आर्थिक सहाय्य कधी मिळते अशी चिंता होती आता त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच हि आर्थिक मदत जमा होणार आहे.
अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा.
संजय गांधी निराधार योजनेची संपूर्ण pdf फाईल करा डाउनलोड.
ग्रामीण भागामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांना किंवा जे संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात माहिती नसण्याची शक्यता आहे.
त्यामुळे संजय गांधी निराधार योजना ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे.
या योजनांविषयी खालील प्रश्ने पहा.
संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज कोठे करावा?
संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेचा अर्ज करण्यासाठी तहसील कार्यालय येथे हा अर्ज सादर करावा.
श्रावण बाळ योजना किंवा संजय गांधी निराधार योजनेची फाईल डाउनलोड कोठे करावी?
वरील दोन्ही योजनेच्या pdf फाईल या लेखामध्ये दिलेल्या आहेत. त्या डाउनलोड करून घ्या.
संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्रता काय आहे?
१८ ते ६५ वर्षामधील अशी व्यक्ती ज्या व्यक्तीचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २१ हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
श्रावण बाळ योजनेसाठी पात्रता कोणती आहे?
दारिद्र्य रेषेखालील यादीच्या कुटूंबात नांव असेल व २१ हजार रुपयांपेक्षा पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ किंवा ६५ वर्षावरील व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.