राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांना २ मेपासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर नवीन शैक्षणिक वर्ष १२ जूनपासून सुरू होणार आहे
विदर्भात मात्र, 26 जूनपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
पहा काय सांगितले शिक्षण विभागाने
इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल ३० एप्रिलपर्यंत लागणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शाळांची आणि महाविद्यालयांची असणार आहे
तर शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या या ७६ पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता शिक्षणाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.
याशिवाय बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, तर दहावीचा निकाल त्यानंतर ८ ते १० दिवसांत जाहीर होऊ शकतो, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
दरम्यान आगामी शैक्षणिक वर्षापासून स्कूल बस असोसिएशनने स्कूल बसच्या शुल्कात 15 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.