गडचिरोली: पोलीस अधीक्षक, गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. मौजा सिरोंचा येथे, दिनांक 08 फेब्रुवारी 2023 ते 09 फेब्रुवारी 2023 रोजी पर्यंत हजरत वली हैदरशाह बाबा उर्स उत्सव साजरा होणार आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री यात्रा उत्सव व दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती जिल्ह्यात सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. तसेच काही राजकीय पक्ष,संघटना व इतर नागरिक हे धरणे,मोर्चे,आंदोलने, सभा, मिरवणूक, सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक 05.02.2023 चे 00.01 वा ते दिनांक 19.02.2023 चे 24.00 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम ,1951 चे कलम 37(1) (3) संपूर्ण गडचिरोली जिल्हयात लागू करण्यात आली आहे. असे अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
Related Articles
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा
पुणे दि. २० : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. पूजेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. […]
भरडधान्य पिकांच्या पुस्तिकेमध्ये शिफारशी, सुधारणा सुचविण्याचे कृषी विभागाचे आवाहन
भरडधान्य पिकांच्या पुस्तिकेमध्ये शिफारशी, सुधारणा सुचविण्याचे कृषी विभागाचे आवाहन गडचिरोली,, दि. 21 : भरडधान्य, पौष्टिक तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुस्तिकेत या पिकांचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे लागवड तंत्रज्ञान, कीड रोग व्यवस्थापन याविषयी माहिती देण्यात येणार आहे. […]
उत्तम व्यवस्थापनाद्वारे मत्स्यव्यवसाय विभाग करणार मत्स्यसाठ्यांचे संवर्धन
मत्स्यप्रेमींना उत्तम मासे सतत मिळत राहावेत यासाठी उपाययोजना मुंबई, दि. १८ : समुद्रातील मासेमारी करतांना अनेकदा लहान आकाराचे व कमी वयाचे मासे पकडले जातात. अशा अल्पवयीन माशांना त्यांच्या जीवनकाळात एकदाही प्रजोत्पादनाची संधी मिळत नसल्याने त्याचा परिणाम पुढील वर्षाच्या मत्स्योत्पादनावर होतो, त्यामुळे अपरिपक्व मासे पकडणे टाळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. विशेषतः मत्स्यप्रेमींना […]