महाडीबीटी अंतर्गत बीज भरणा योजनेला सुरुवात; असा करा अर्ज MAHADBT YOJNA बियाणे, औषधे व खते हे राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून वितरण अनुदान २०२३ या योजनेच्या संबंधित आपण या लेखात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. या मध्ये बी-बियाणे अनुदानात समाविष्ट जिल्हे कोणते व त्या अनुदानावर पिके कोणती, त्यासाठी पात्रता काय, आणि हो आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील, अर्ज कुठे आणि कसा करायचा इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात बघणार आहोत. या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल, तर हा लेख संपूर्ण नक्कीच वाचा.
पिकांसाठी पेरणीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत औषध, बी-बियाणे, तसेच खते इत्यादीसाठी ऑनलाईन अर्ज हे महाडीबीटी या पोर्टल वरती सुरू आहेत. या योजनेचा तुम्ही नक्कीच लाभ घ्यावा. MAHADBT YOJNA राज्य शासनाच्या या पोर्टलवर शेतकरी योजना शीर्षका या अंतर्गत बी-बियाणे, औषधे आणि खते इत्यादी घटकाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा हि उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपण यामध्ये तुर, मुग,सोयाबीन,मका , उडीद, खरीप ज्वारी या बियाणे करीत तुम्ही अर्ज हे करू शकता. या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची/ लाभार्थ्यांची निवड प्राप्त सर्व अर्जा मधून लॉटरी पद्धतीने लाभार्त्याची निवड हि करण्यात येईल. या लॉटरी पद्धतीद्वारे ज्या शेतकरी बंधूंची निवड होईल त्याच लाभार्थ्याला अनुदाना स्वरूपावर बी- बियाणे मिळेल. अर्ज ज्या पिकाच्या बियाण्यासाठी केला आहे, उपलब्धतेनुसार त्याच पिकाचे बियाणे व वाण मिळेल
MAHADBT YOJNA लागणारे कागदपत्रे
- ८-अ प्रमाणपत्र
- ७/१२ प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक