अहेरी :-
राज्यातील जनतेत महायुती सरकारबद्दल मोठी अस्वस्थता आहे. राज्यात लेकींवर अन्याय- अत्याचाराचे सत्र सुरू असून या सरकारला हद्दपार करणे गरजेचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांचे हात मजबूत करण्यासाठी या लेकीला शक्ती देण्यासाठी विधानसभेत आमदार बनवून पाठवा. त्यांच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे आहोत, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. आलापल्ली येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांची आज, मंगळवारी
प्रचारसभेप्रसंगी मंचावर उपस्थित खा. सुप्रिया सुळे, उमेदवार भाग्यश्री आत्राम, खा. नामदेव किरसान
आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या. मंचावर खा. नामदेव किरसान, महिला आघाडीच्या शाहीन हकीम, प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, अॅड. अंजली साळवे, सुरेश गुडधे पाटील, अरुण धुर्वे, सुरेश सावकार पोरेड्डीवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष निसार हकीम आदी उपस्थित होते. भाग्यश्री आत्राम म्हणाल्या, जनतेच्या हितासाठी मी राज परिवार, वडिलांचे घरदार सोडून बाहेर पडली आहे. येथील जनसामान्य लोकांचे कल्याण हेच माझे लक्ष्य आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे.