ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

शिक्षकांच्या मानधनात वाढ येथे पहा सुधारित मानधन

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, परंतु शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे याची अंमलबजावणी रखडली होती.

राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पहील्या तीन वर्षाकरीता मानधन तत्वावर नियुक्ती देणेबाबत शासन निर्णय दिनांक २५.११.२००५ अन्वये निर्णय घेण्यात आला होता. सदर शासन निर्णयानुसार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना खालीलप्रमाणे मानधन अनुज्ञेय करण्यात आले होते.

1st – GR शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा

2nd – GR शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

निवडणुका पार पडताच याविषयीचा शासननिर्णय जारी करण्यात आला असून १ जानेवारी २०२३ पासून शिक्षकांना वाढीव मानधन मिळणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. अनुदान पात्र शाळांना वाढीव टप्पा घोषित करण्याच्या निर्णयाचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

मराठीबाबत ग्रेडिंगचा पर्याय शाळांमध्ये मराठी अनिवार्य केले आहे. मात्र ज्यांनी पहिलीपासून मराठी शिक्षण घेतलेले नाही अशांना मराठी अडचणीचे ठरू शकते. यासाठी ग्रेडिंगच्या पर्यायावर विचार सुरू असल्याचे केसरकर म्हणाले. “Shikshak Mandhan Vadh”

सदर शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मानधनात २००५ नंतर वाढ करण्यात आलेली नाही. नियमित

शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनात झालेली वाढ, वाढती महागाई या सर्व बाबींचा विचार करुन शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

1st – GR शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा

2nd – GR शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

येथे पहा सुधारित मानधन

शिक्षकांचे सुधारित मानधन  राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रथम नियुक्तीपासून

पहील्या तीन वर्षासाठी खालीलप्रमाणे मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

प्राथमिक, उच्च प्राथमिक 16,000 रु.
माध्यमिक 18,000 रु.
उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय 20,000 रु.
शिक्षकेतर कर्मचारी पूर्णवेळ मानधन 14,000 रु.
प्रयोगशाळा सहायक 12,000 रु.
कनिष्ठ लिपिक 10,000 रु.
चतुर्थ श्रेणी कर्मचारी 8,000 रु.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दिनांक ११.१२.२०२० नुसार चतुर्थश्रेणी कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर सदर पद व्यपगत करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार शाळांना चतुर्थश्रेणी पदाऐवजी शिपाई भत्ता लागू करण्यात आला आहे. तथापि, अनुकंपा तत्वावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी लागू होत असल्याने या प्रकारे चतुर्थश्रेणी पदावर नियुक्त होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाच वरील तक्त्यातील मानधन लागू असेल. तसेच जे चतुर्थश्रेणी कर्मचारी दि.११.१२.२०२० पूर्वी चतुर्थश्रेणी संवर्गात सेवक या पदावर नियुक्त करण्यात आले आहेत व ज्यांचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात आलेला नाही, त्यांना देखील वरील मानधन अनुज्ञेय राहील.