माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराजांचे कट्टर समर्थक श्री संतोष ऊर्फ पप्पु दादा मद्दीवार यांची तेलंगाना विधानसभा निवडणुकीत सिरपुर-कागजनगर विधानसभा क्षेत्राचे प्रभारी म्हणुन नियुक्ती झाल्या बद्दल अभिनंदन!
तेलंगानातील गत विधानसभा निवडणुकीत सुध्दा त्यांनी तेथे प्रभारी म्हणुन काम पाहीले होते. त्यावेळेस संतोषजींनी घेतलेल्या ऊल्लेखनीय परिश्रमाची दखल घेऊन यावेळेस पुन्हा त्यांना *गजवेल* या तेलंगानातील सर्वात महत्वाच्या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी देण्यात आली होती.केसीआर आणि इटाला राजेंद्र हे दोन्ही मुख्यमंत्रीपदाचे ऊमेदवार गजवेल याच मतदार क्षेत्रात एकमेकाविरुध्द ऊभे ठाकले आहेत परंतु अंतर फार असल्याने असमर्थता दर्शवीली होती नंतर त्यांना त्यांच्या इच्छेनुसार क्षेत्र निवडण्यास सांगीतले असता संतोषभाऊंनी सिरपुर निवडले.!
तेलंगाना निवडणुकीत मोजकेच बिगर आमदार प्रभारी आहेत त्यात संतोषभाऊ आहेत एखाद्या कार्यकर्त्याच्या कार्यक्षमतेची दखल केंद्रापर्यंत घेतली जाते परंतु जिल्हापातळीवर मोठ्या पदाधिकार्यांचा अहंकार आणि नंदीबैलासारखे मान डोलावणार्या हस्तकांना पदे वाटण्याच्या संस्कृतीमुळे कर्तबगार व्यक्तीला स्थानच नसते याचे मुर्तीमंत ऊदाहरण कार्यकर्त्यांना बघायला मिळत आहे!
