मुलचेरा-: दिनांक 1 आगस्ट पासून सुरु झालेल्या महसूल पंधरवाडा कार्यक्रम अंतर्गत *सैनिक हो तुमच्यासाठी*हा विशेष उपक्रम मुलचेऱ्याचे प्रभारी तहसीलदार लोमेश उसेंडी यांच्या अध्यक्षतेखली तहसील कार्यालयात दिनांक 10 आगस्ट ला आयोजीत करण्यात आला होता. प्रभारी तहसीलदार लोमेश उसेंडी यांचे हस्ते तालुक्यातील माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.देशाच्या रक्षणासाठी, आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपल्या प्राणाची बाजी लावीत असतात असे प्रतिपदान प्रभारी तहसीलदार लोमेश उसेंडी यांनी केले. सदर कार्यक्रमात माजी सैनिकांनी आपल्या गतकाळातील गोष्टींना उजाळा देत देशासाठी केलेल्या अभूतपूर्व साहसाची माहिती दिली. आजच्या कार्यक्रमात तहसील कार्यालयातील कर्मचारी, शिपाई उपस्थित होते.
Related Articles
आपसी समन्वयातून विकास कामे मार्गी लावा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
गडचिरोली दि. 14 : गडचिरोली जिल्ह्यात विकासकामांसाठी प्रचंड वाव असून, विविध विभागांनी आपसी समन्वय साधून जिल्हा नियोजन विकास निधीचा योग्य वापर करून कामे मार्गी लावावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले. त्यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत प्रकल्पांसाठी योग्य नियोजन आणि निधीचा प्रभावी उपयोग करण्याचे सांगितले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विविध […]
महाराष्ट्र शासनाचे ११, १६, २१ आणि २६ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र शासनाचे 11 वर्षे मुदतीचे 1 हजार 500 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र शासनाच्या अकरा वर्षे मुदतीच्या 1 हजार 500 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी […]
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती
The Power Grid Corporation of India Limited is an Indian state-owned electric utilities company headquartered in Gurgaon, India. POWERGRID transmits about 50% of the total power generated in India. PGCIL Recruitment, POWERGRID Recruitment 2023 (PGCIL Bharti 2023, POWERGRID Bharti 2023) for 425 Diploma Trainee Posts. जाहिरात क्र.: CC/06/2023 Total: 425 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. […]