गडचिरोली:- सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात प्रवर्गातून व्यावसायीक पाठयक्रमात राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ज्या वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यांनतर वैधता प्रमाणपत्राबाबत सामान्यत: 3 ते 5 महिन्याचा आत समिती निर्णय घेते. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव विद्यार्थ्यांनी 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यानी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव विहीत नमून्यात (ऑनलाईन) अर्ज आवश्यक दस्ताऐवज MH-CET, JEE, NEET, B.ED CET, M.ED CET, LLB CED, B.SC AGRI CET, व MBA CET या सारख्या इतर प्रवेश पात्रता परीक्षकरीता भरण्यात आलेल्या अर्जाची प्रतीसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय.चौक, एल.आय.सी. रस्ता, कॉम्पलेस,गडचिरोली, या कार्यालयात उपस्थित होऊन सादर करावे. असे आवाहन उपायुक्त देवसूदन धारगावे यांनी केले आहे.
Related Articles
समाजप्रबोधनाचे नवभारत टाइम्सचे कार्य मोलाचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि १ :- समाजाचे प्रबोधन करण्याचे, दिशा देण्याचे नवभारत टाइम्सचे कार्य मोलाचे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वांद्रे येथे नवभारत टाइम्सच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘एनबीटी उत्सव 2023’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सिवा कुमार सुंदरम, पार्था सिन्हा व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी […]
राजभवनात ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ रेखाचित्र कार्यशाळेचा समारोप
मुंबई, दि. ६ : राजभवन येथे आयोजित सर जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसांच्या ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ या विषयावरील कार्यशाळेचा समारोप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत रविवारी राजभवन येथे झाला. राज्यपालांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची तसेच अधिव्याख्यात्यांची रेखाचित्रे पाहिली व त्यांना कौतुकाची थाप दिली. विद्यार्थ्यांनी काढलेली छायाचित्रे राजभवनातील प्रमुख वास्तूंमध्ये दर्शनी भागात लावण्यात येतील, […]
महाराष्ट्र आणि ओंटारियो राज्य (कॅनडा) यांच्यात सामंजस्य करार; राज्यात विविध क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार
मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र आणि कॅनडा देशातील ओंटारियो या दोन राज्यांमध्ये विविध क्षेत्रातील गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. उद्योग मंत्री उदय सामंत व ओंटारियो राज्याचे (कॅनडा) आर्थिक विकास, रोजगार निर्मिती आणि व्यापार मंत्री व्हिक्टर फेडेली यांच्या स्वाक्षरीने हा सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार राज्यात माहिती तंत्रज्ञान, वित्त, मीडिया, ऑटोमोबाईल, अन्न प्रक्रिया, अंतराळ (एरोस्पेस) […]