ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शारीरिक व भौतिक विकासासाठी खेळ महत्त्वाचा भाग : जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार

झिमेला येते क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सम्पन्न

अहेरी – खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास सहजपणे होऊ शकतो.शारीरिक व मानसिक दृष्ट्या खेळाडू खेळातून कणखर बनत असतो  क्रिकेट,व्हलिबाल,कबड्डी हे तीन खेळ या ग्रामीण भागात जास्त प्रमाणात आयोजित केले जातात व खेळाडूंनी हिरीरीने भाग घेवून खेळत असतात या प्रत्येक खेळातून युवकांच्या व्यायाम होत असतो त्यातून खेळाळूच्या शारीरिक,भौतिक व मानसिक विकास होऊन खेळाच्या माध्यमातून खेळाडू हा सुदृढ बनत असतो त्यासाठी नियमित खेळने आवश्यक असते मात्र ग्रामीण भागात कसल्याही प्रकारचे क्रीडांगण नसल्याने अनेक अडचणी येत असतात मात्र या अडचणीच्या सामना करत सतत खेळाकडे लक्ष देवून खेळत राहावे जय पराजय होत असतो मात्र आपण हरलो म्हणून खचून ना जाता खेळल्यास एक दिवस आपली विजयी निश्चितच होऊ शकतो.असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी झिमेला येते जय सेवा क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित भव्य टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटना प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा कोंडागूर्ले मँडम वनपरिक्षेत्राधिकारी एफ.डी.सी.एम.अहेरी होत्या, तर विशेष अतिथि म्हणून अहेरी,पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी सभापती सौ.सुरेखा आलाम,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून तिमरमचे उपसरपंच श्री.प्रफूल नागुलवार,देवलमरीचे उपसरपंच हरिष गावडे,निबुडगे साहेब वनपाल,महेश मडावी माजी सरपंच तिमरम,अनिल मडावी सामाजिक कार्यकर्ता,चव्हाण साहेब वनरक्षक,गेडाम साहेब वनरक्षक,दिवाकर गावडे,ग्रा.प.सदस्य,धर्मराज पोरतेट माजी उपसरपंच,गुलाबराव सोयाम माजी सरपंच इंदाराम,संजय पोरतेट माजी उपसरपंच राजाराम,श्रीनिवास राऊत आविस सल्लागार,विस्तारी तलांडे,राठोड सर,समया पेंदाम,अंचतराव सिडाम,दिवाकर आलाम,संदीप दुर्गे आदि मंचावर होते.या क्रिडा स्पर्धेसाठी पहिला  पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन तर दुसरा पारितोषिक मा.वनपरिक्षेत्राधिकारी एफ.डी.सी.एम.अहेरी ग्राम पंचायत तिमरम यांच्याकडून तर तिसरा पारितोषिक माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम व माजी जिल्हा परिषद सदस्या कु.सुनीता कुसनाके यांच्या कडून देण्यात येत आहे..!!
सदर कार्यक्रमाच्या संचालन व आभार प्रदर्शन मडावी सर यांनी केले.कार्यक्रमा यशस्वीतेसाठी मंडळाचे आयोजक श्री.सुरेश पोरतेट,विनोद तोरैम,मंडळाचे अध्यक्ष श्री.कमलेश सिडाम,दिपक गेडाम,राहुल गेडाम,विशाल पोरतेट,विल्सन पोरतेट,संतोष सिडाम,आदिनी सहकार्य केले.यावेळी गावातील महिला-पुरुष मोठ्या संख्यने उपस्थित होते