सिरोंच्या येथे प्रसिद्ध बालाजी मंदिरात श्रीमाता गोदादेवी व श्रीरंगनाथ स्वामी कल्याण महोत्सव मोठ्या थाटात साजरा
अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते झाले विधिवत पूजन
*कल्याण महोत्सवाला हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित..!
गडचिरोली:- जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर, तेलंगणा राज्य सीमेवर असलेल्या सिरोंचा येथे अतिप्राचीन व प्रख्यात बालाजी मंदिरात दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर दक्षिणात्य परंपरेनुसार हजारो वऱ्हाडीच्या(भक्तांच्या) साक्षीने,तेलंगणाच्या वेद पंडितांच्या मंत्रोपचाराने,वाजयंत्रीच्या गजराने श्री माता गोदादेवी व श्री रंगनाथ स्वामींचा कल्याण महोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला.
सिरोंचा येथील बालाजी मंदिरात दरवर्षी श्री माता गोदादेवी व श्रीरंगनाथ स्वामी कल्याण महोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.रोज सकाळी पूजन, आरती, भजन-कीर्तन केले जातात. त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन जाते.या कल्याण महोत्सवाला गडचिरोली जिल्ह्यासह तेलंगणा,आंध्रप्रदेश, छत्तीसगड राज्यातील भक्तगण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भगवान बालाजीसह श्री माता गोदादेवी व श्रीरंगनाथ स्वामीचे दर्शन घेत असतात.
सिरोच्या येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या श्री माता गोदादेवी व श्रीरंगनाथ स्वामी कल्याण महोत्सवाला अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी विशेष उपस्थिती दर्शवली आणि श्री माता गोदादेवी व श्रीरंगनाथ स्वामी यांचे विधिवत पूजन केले.या कल्याण महोत्सव करीत त्यांच्या कडून 71000/-(एकात्तर हजार रुपये) देणगी दिली व श्री माता गोदादेवी व श्री रंगनाथस्वामी कल्याण महोत्सवातील भक्तगणांना महाप्रसादचं वितरण करून आनंद द्विगुणीत केला.
यावेळी श्री माता गोदादेवी व श्रीरंगनाथ स्वामी कल्याण महोत्सवाचे पदाधिकारी,वेद पंडित,पुजारी,मोठ्या प्रमाणात बालाजी भक्तगण आणी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व सिरोंच्या येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!