गडचिरोली : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील धान अद्याप आदिवासी विविध सहकारी सोसायटीमार्फत खरेदी करण्यात न असल्याने शेतकऱ्यांना मध्ये तीव्र सांतप व असंतोष पसरले आहे. मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी भरपूर नुकसान झाले आहे.तरी हा तीन चार दिवसात लवकरत लवकर धान खरेदी सुरु करण्यात यावी अशी आदिवासी विध्यार्थी संघ व अजयभाऊ मित्र परिवारचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीणा साहेबांची दूरध्वनीद्वारे संवाद साधून.धान उत्पादक शेतकऱ्यांचा समस्या सविस्तरपणे सांगून मागणी केली आहे.या तीन चार दिवसात उन्हाळी हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांची उन्हाळी धान आदिवासी विविध सहकारी सोसायटी मार्फत धान खरेदी न केल्यास उत्पादक शेतकऱ्यांना व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन नियमाचे पालन करून आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दिला आहे
Related Articles
गडचिरोली जिल्ह्यात वीज ग्राहकांच्या सेवेसाठी लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी
जिल्ह्यातील दुर्गम व जंगलांचा प्रदेश ध्यानात घेता प्रत्येक गावातील शेवटच्या घरापर्यंत वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी, अशी सूचना एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी केली. गडचिरोली येथे महावितरण, महापारेषण, महाऊर्जा व विद्युत निरीक्षक विभागाच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार कृष्णा गजबे, महावितरणचे मुख्य अभियंता […]
निर्यातदारांसाठी २८ व २९ सप्टेंबर रोजी कार्यशाळा आणि प्रदर्शन
मुंबई, दि. 26 : मुंबईतील निर्यातदारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा तसेच जिल्ह्यातील निर्यातदारांचे निर्यातक्षम उत्पादनाचे दोन दिवसीय प्रदर्शन 28 व 29 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी सभागृह, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मजदूर मंजिल, जी.डी.आंबेकर मार्ग, भोईवाडा, परेल, मुंबई-400012 येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हा उपक्रम मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात […]
उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांचा गौरव.
मुलचेरा -: सन 2023 मधील मतदार यादीचे अद्यावतीकरण, तक्रारीचे निवारण, मतदार यादीमध्ये नवीन युवा मतदारांचे नाव नोंदणीसाठी राबविलेलेले नावीन्यपूर्ण उपक्रम या कार्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांचे कार्यालयामार्फत राष्ट्रीय मतदार दिनांचे औचित्य साधून उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.सदर राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाला […]