गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्याचे अन्न व औषध प्रशासन कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतली तहसिल कार्यालय मुलचेरा येथे आढावा सभा

अधिकाऱ्यांना जाब विचारात तात्काळ समस्यांचे निराकरण करण्याचे दिले निर्देश

मुलचेरा:
तहसिल कार्यालय मुलचेरा येथे २६ ऑगस्ट रोजी कार्यालयातील सभागृहात अन्न व प्रशासन कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थित विविध विभागांची आढावा सभा घेण्यात आली,याप्रसंगी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,माजी प स सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम,माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,उपसरपंच महेंद्र बाबा आत्राम, तहसीलदार चेतन पाटील,गटविकास अधिकारी,एल बी जुवारे,ठाणेदार अशोक भापकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जावेद शेख,तालुका कृषी अधिकारी विकास पाटील,वैद्यकीय अधीक्षक डॉ ललित मल्लिक, वनपरिक्षेत्र अधिकारी भावना अलोने, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, मुख्यमंत्री तथा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनाचे अधिकारी तसेच आदी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आढावा सभेत बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले आपण मंत्रीपदावर असताना १९९२ मध्ये जिल्ह्यात ४ नवीन तालुक्यांची निर्मिती केली होती.त्यात मुलचेरा तालुक्याचाही समावेश आहे.चामोर्शी तालुक्याचा विभाजन करून मुलचेरा या नवीन तालुक्याची निर्मिती झाल्यावर येथील नागरिकांना चामोर्शी ऐवजी मुलचेरा येथे सर्व कार्यालय उपलब्ध झाले.त्यामुळे तालुक्यात आवश्यक सोयी-सुविधा मिळाल्याने नागरिकांची मोठी समस्या दूर झाली आहे.मात्र सध्या खेड्यापाड्यातील नागरिकांना त्रास दिला जात असल्याची माहिती समोर येत असून यापुढे कुठल्याही कामानिमित्त तालुका मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांना त्रास होता कामा नये.अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

त्यावेळी त्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला त्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,वीज वितरण विभाग व वन विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यप्रणालीवर प्रशचिन्ह उपस्थित केली की,मूलचेरा तालुक्यातील जनतेला या विभागातर्फे सहकार्य लाभत नाही आणि नागरिक या कार्यालयाचे चकरा मारवे लागते,ही नागरिकांची समस्या ऐकून त्यांनी थेट आढावा सभेतून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. यावेळी तालुक्यातील विविध गावातील नागरिकांनी अन्न व प्रशासन कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासमोर आपल्या गावातील अनेक समस्या मांडल्या व त्यांनी त्या ऐकून घेत, त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारात तात्काळ समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले.