देसाईगंज: तरुणांनी उद्योजक बनण्यासाठी केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना अंमलात आणली असुन सन २०२०-२१ ते २०२४-२५ अशी ५ वर्षे राबविली जाणार आहे या योजने अंतर्गत अन्य प्रक्रिया संबधीत सर्व उद्योग करता येतील या योजनेमध्ये प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के व कमाल १० लाख असे अनुदान देण्यात येणार आहे तसेच प्रकल्प किंमतीच्या ९० टक्के पर्यंत बँक कर्जाची सोय या योजने मध्ये करण्यात आली आहे या योजने अंतर्गत वडसा तालुक्यातील किन्हाळा येथे हितेश नाकाडे यांनी आटा व मसाले उद्योग चालु केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला तालुका कृषि अधीकारी निलेश गेडाम, बँक ऑफ इंडिया वडसाचे शाखा व्यवस्थापक शेख, जिल्हा संसाधन व्यक्ती आशिष चापले, कृषि सहाय्यक मडावी व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी तालुका कृषि अधिकारी निलेश गेडाम यांनी तालुक्यातील इतर तरुणांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केले तर शाखा व्यवस्थापक शेख यांनी बँक संबंधी माहिती दिली जिल्हा संसाधन व्यक्ती आशिष चापले यांनी या योजने बद्दल सविस्तर माहिती दिली योजने अंतर्गत वैयक्तीक लाभार्थी स्वयं सहाय्यता बचत गट सहकारी संस्था, शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी पतसंस्था इत्यादींना लाभ घेता येतो. योजने अंतर्गत अर्ज सादरिकरण प्रशिक्षण, बैंक सहकार्य व इतर कामात कृषि विभागातर्फे सहकार्य केले जाणार आहे तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व अधिक माहिती साठी व अर्ज सादरिकरणासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय वडसा येथे भेट द्यावी, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी निलेश गेडाम यांनी केले आहे.
Related Articles
केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांची मोठी घोषणा ! – भारतात तयार होणार आयफोन
TATA ग्रुप लवकरच भारतात Apple iPhone चे उत्पादन सुरू करणार आहे. टाटा ग्रुप स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेसाठी हे उत्पादन सुरू करेल, अशी माहिती केंद्रीय इलक्ट्रॉनिक आणि टेक्नॉलॉजी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे. यापूर्वी जगभरात विकले जाणारे बहुतांश आयफोन चीनमध्ये तयार केले जात होते. मात्र आता भारतात आयफोनचे उत्पादन सुरू झाले आहे. पहा काय सांगितले […]
कोकण सुजलाम् सुफलाम् झाला पाहिजे – उद्योगमंत्री उदय सामंत
स्वराज्यभूमी कोकण महोत्सवाला उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट मुंबई, दि. 8 :- कोकण सुजलाम् सुफलाम् झाला पाहिजे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. कोकणाच्या भूमीतील पारंपरिक उद्योगांना ग्राहकमंच मिळवून देण्याकरिता मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदान येथेआयोजित करण्यात आलेल्या ‘स्वराज्य भूमी कोकण’ महोत्सवास आज उद्योगमंत्री श्री. […]
(IMA) इंडियन मिलिटरी अकॅडेमीत ‘ग्रुप C’ पदांच्या 188 जागांसाठी भरती
Total: 188 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 कुक स्पेशल 12 2 कुक IT 03 3 MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी) 10 4 बूट मेकर/रिपेयर 01 5 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 03 6 मसालची 02 7 वेटर 11 8 फातिगमन 21 9 MTS (सफाईवाला) 26 10 ग्राउंड्समन 46 11 GC ऑर्डली […]