अहेरी येथील ऐतिहासीक दसरा मेळाव्याला संबोधन करतांना राजे अम्ब्रीशराव महाराजांनी अहेरीच्या दसर्याला फार मोठी ऐतिहासीक पार्श्वभुमी आहे.पिढ्या न पिढ्यांपासुन चालत आलेली परंपरा आहे.ही गौरवशाली परंपरा केवळ राजपरीवाराची नसुन संपुर्ण जनतेची आहे व हा महोत्सवच जनतेचा अाहे त्यामुळे ती कायम राखणे हे आपल्या सर्वांची जिम्मेदारी आहे असे प्रतिपादन केले.बर्याच वर्षांपासुन अहेरीच्या दसर्याचे प्रस्थ कमी व्हावे व समाज विखुरला जावा यासाठी व राजकीय हेतुने विविध ठिकानी दसरा मेळावा आयोजीत करण्याचे प्रयत्न केल्या जात आहे परंतू आजही जनतेचे आमच्या परिवारावरचे प्रेम दिसुन येत आहे ते बघुन मी भारावुन गेलो आहे तसचे राजपरीवार आपला ॠणी राहील असे सांगीतले.
पुढे बोलतांना संपुर्ण अहेरी ईस्टेटच्या जनतेला पुष्कळ समस्यांना सामोरे जावे लागत आहे हे बघतांना फार दुःख होत आहे.बहुतांश समस्यांचे मुळ सुरजागड प्रकल्पच असल्याचे दिसत आहे.तुमच्यामुळेच रस्त्यांचे व पर्यायाने नागरीकांचे हाल झाले आहेत ते निर्माण करण्याची जबाबदारीही तुमचीच आहे.जनतेवर अन्याय,अत्याचार झाल्यास सहन करणार नाही असा इशारा राजे साहेबांनी ऐतिहासीक दसरा महोत्सवाच्या मंचावरुन दिला. त्रस्त,पिडीत जनता रस्त्यावर आल्यास मलाही रस्त्यावर ऊतरावेच लागेल असा गर्भीत इशारा दिला.
आजकाल प्रत्येक विषयावर राजकारण केल्या जात आहे ही बाब खेदजनक आहे.आदर्श दुर्गोत्सव मंडळाला आम्ही दुर्गोत्सव साजरा करता यावा यासाठी ४० वर्षे जागा दिली तरीही त्यांचे काही सदस्य आम्हालाच शिवीगाळ करत असायचे.देवी मातेसाठी जागा दिली नसल्याचे बोलत आहेत.आज माझ्याकडे जे काही आहे ते मातेच्याच कृपेने आहे त्यामुळे मातेला देण्याईतका मोठा नसल्याचे सांगीतले.बर्याच वर्षांपासुन ती जागा खेळाचे मैदान आहे त्यामुळे दुसरी जागा शोधा मी मंदीर ऊभारण्यासाठी परीपुर्ण मदत करण्याचे आश्वासन देत होतो त्यावर त्यांनी कधीही विचार केला नव्हता.काही मोजक्या लोकांनी दुर्गोत्सवाला खाजगी मालमत्ताच करुन टाकली.आजवर मिळालेल्या देणग्याचा गैरवापर केल्या गेले नसते तर भव्य मंदीर ऊभारु शकतो एवढा निधी मंडळाकडे शिल्लक राहीला असता असे सांगीतले.आता त्या धार्मीक ऊत्सवातून राजकीय भाषणे व्हायला लागली त्यामुळेच आज बोललो अन्यथा हा मंच त्याविषयासाठी नाही असे स्पष्ट केले.
कोरोनाच्या सावटा नंतर यंदाच्या दसर्याला नागरीकांनी अभुतपुर्व ऊपस्थिती नोंदवीली होती.महाराष्ट्र,छत्तीसगढ पाठोपाठ यंंदा तेलंगाणातुन मोठ्या प्रमाणात नागरीकांनी हजेरी लावली त्यामुळे बाजारपेठा सुध्दा फुलुन गेल्या होत्या.