महेंद्रसिंग धोनीनंतर ऋषभ पंत हा भारताचा सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक फलंदाज आहे, जर तो पाकिस्तानमध्ये असता तर तो कधी विश्वचषक सामन्यातून बाहेर बसला असता का? नसता बसला, माजी खेळाडूचे वक्तव्य
टी-२० विश्वचषक २०२२ मधील पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीनंतर सर्वजण त्यांच्यावर टीका करत आहेत. पाकिस्तानचे माजी खेळाडू संघाची खराब कामगिरी, रणनीती, कर्णधारपद तसेच संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. दरम्यान, आता भारताचे उदाहरण देत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वहाब रियाझनेही संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
यादरम्यान त्याने असेही सांगितले की, जर ऋषभ पंत पाकिस्तानमध्ये असता, तर तो वर्ल्ड कप सामन्यामधून बाहेर बसलानसता. भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंत ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक भारतीय संघाचा एक भाग आहे, परंतु पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेली नाही.
२४ न्यूजशी बोलताना वहाब रियाझ म्हणाला, ”तुमची यंत्रणा मजबूत असेल तर या गोष्टी होणार नाहीत. कोण मजबूत करतो? जे होल्ड करतात. निवड प्रक्रिया एक अशी आहे की, आमिर असो वा उमर गुल, किंवा शोएब अख्तर किंवा सोहेल तनवीर, जर तुम्हाला देशांतर्गत क्रिकेटचे निकष दिले गेले असतील… जर त्यांनी त्यात कामगिरी केली आणि ते तंदुरुस्त असतील तर त्यांनी खेळावे.”
वहाबने या दरम्यान भारताचे उदाहरण देताना सांगितले की, ऋषभ पंतसारख्या प्रतिभावान खेळाडूला बाहेर ठेवून भारत दिनेश कार्तिकला संधी देत आहे. कारण त्यांना सामना फिनिश करू शकणार्या फलंदाजाची गरज आहे. पंत तिथे दोन षटकार मारेल, पण तो सामना जिंकवून देऊ शकला नाही तर संघाचा पराभव होईल, असे वहाबने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ”आपला शेजारी देश याचे उदाहरण आहे. ऋषभ पंत हा एमएस धोनीनंतर भारताचा सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाज आहे, त्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतकं झळकावली आहेत. तो पाकिस्तानात असता तर कधी वर्ल्डकप सामन्यातून बाहेर बसला असता का? नसता बसला, भारताने त्याला बसवले, दिनेश कार्तिकची जागा का? पंत हा चांगला क्रिकेटपटू आहे हे त्यांना माहीत आहे, पण त्यांना त्या क्रमांकावर फिनिशरची गरज आहे. तो दोन षटकार मारेल पण सामना फिनिश के नाही तर आपण हरू. असे असायला हवं.”