गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा वतीने पी एम किसान ई-केवायसी करण्यास जनजागृती

मुलचेरा:

देशामधील खेड्यागावातील सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे शेती. देशाची अर्थव्यवस्थासुद्धा मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. अशामध्ये शेतकऱ्याना आर्थिक सहाय मिळावे या अनुषंगाने शासनामार्फत विविध योजना चालविल्या जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण योजना आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 हजार रु. याप्रमाणे मानधन दिलं जात. ही एकत्रित रक्कम शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये दोन-दोन हजार रु. याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यावरती पाठवली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यावरती 11वा हप्ता ट्रान्स्फर करण्यात आलेला आहे.

आता शेतकरी वाट पाहत आहेत 12 व्या हफ्त्याची. परंतु 12वा हप्ता मिळवण्यासाठी सरकारमार्फत शेतकऱ्यांना एक अट ठेवण्यात आलेली आहे. ई-केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे सरकारमार्फत पीएम किसान योजनेअंतर्गत 6,000 हजार रु. दिले जाणार नाहीत.

ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी एक संधी देत अंतिम मुदत वाढवून 7 सप्टेंबर 2022 करण्यात आलेली आहे.

या योजने पासुन वंचित शेतकरी राहु नये या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा वतीने तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक यांच्या वतीने लाभार्थ्यांना फोन द्वारे ,भेटी घेऊन ई-केवायसी करण्यास जनजागृती करत आहे.सर्व कृषी सहाय्यक अतिशय मेहनत घेत असून शेवटच्या व्यक्तिपर्यंत पोहचून ई-केवायसी करण्यास सांगत आहे.सर्वत्र ई-केवायसी चे कार्य सुरडीत चालू आहे
कोपरअली येथे कृषी सहाय्यक प्रमोद मुंडे यांनी चक्क गणेश मंडळ येथील लाऊड स्पीकरवर जनतेला ई-केवायसी करण्याचे आव्हान केले आले.

कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक प्रमोद मुंडे यांच्या उपस्थितीत कोपरअली येथे सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत गावातील व इतर लगतील गावातील लाभार्थ्यांना बोलवून ई-केवायसी करण्यात आले.

तसेच सर्व कृषी सहाय्यक आपल्या हद्दीतील येणाऱ्या गावात दर दिवशी गावातील लाभार्थ्यांना बोलवून ई-केवायसी करवून घेत आहे.