चामोर्शी:-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुका काँग्रेस चामोर्शी तर्फे भारत जोडो यात्रेनिमित्त नियोजन बैठक व तालुका काँग्रेस मेळावा दिनांक 13 नोव्हेंबर ला सांस्कृतिक भवन बाजार चौक चामोर्शी येथे दुपारी ११ वाजता आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक महेंद्र ब्राह्मणवाडे अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मारोतराव कोवासे माजी खासदार तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर नामदेव उसेंडी माजी आमदार, डॉक्टर नामदेव किरसान प्रदेश सचिव, माजी आमदार आनंदराव गेडाम, चामोर्शी नगरपंचायत अध्यक्ष जयश्रीताई वायलालवार, चंदाताई कोडवते प्रदेश सचिव, रूपालीताई पंदीलवार जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी,लोमेश बुरांडे उपाध्यक्ष नगरपंचायत चामोर्शी,राजेश ठाकूर जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग,अनिल कोठारे जिल्हा उपाध्यक्ष, नीलकंठ निकाळे ता. अध्यक्ष सरपंच संघटना, विनोद खोबे माजी तालुका अध्यक्ष, संजय वडेट्टीवार काँग्रेस नेते, माधव घरामी,निकेश गद्देवार माजी सरपंच, रवींद्र पाल तर प्रमुख उपस्थिती चामोर्शी नगरपंचायतचे काँग्रेस गटनेते तथा नगरसेवक नितीन वायलालवार, बांधकाम सभापती वैभव भिवापुरे, पाणीपुरवठा सभापती सुमित तुरे, महिला बालकल्याण सभापती प्रेमा अमोल आईचंवार, नगरसेविका वर्षा वैभव भिवापुरे, नगरसेविका स्नेहा गुरुदेव सातपुते आदी उपस्थित राहणार आहेत तरी या नियोजन बैठक तथा मेळाव्याला तालुका व जिल्हा पदाधिकारी सर्व तालुका विभाग काँग्रेस पक्षाचे सर्व सरपंच व ग्रामपंचायत सदस्य,सर्व सेवा सहकारी अध्यक्ष,सदस्य जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष प्रमोद भगत यांनी केले आहे.
Related Articles
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच्या विज्ञान-तंत्रज्ञान उपक्रमांना पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्र; ठाणे येथे विज्ञान केंद्र राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सादरीकरण मुंबई, दि. २०:- शेतकऱ्यांना फायदा होईल अशा रितीने विज्ञान-तंत्रज्ञानाचे उपक्रम राबवावेत. त्याला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांनी […]
(ACN) नाशिक तोफखाना केंद्रात ‘ग्रुप-C’ पदांच्या 107 जागांसाठी भरती
Artillery Centre Nashik Recruitment 2022 Direct Recruitment of Group C Civilian Posts in Artillery Centre Nasik, School of Artillery Devlali and Artillery Records Nasik. Artillery Centre Nashik Recruitment 2022 (Artillery Centre Nashik Bharti 2022) for 107 Group C Posts. Total: 107 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 निम्न श्रेणी लिपिक […]
सामान्यांच्या आरोग्यावरील खर्चात जन औषधी केंद्रांमुळे मोठी बचत -राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन
मुंबई दि. 8 : “जन औषधी केंद्रांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावरील खर्चात मोठी बचत होत आहे. यामुळे गरीब नागरिकालाही औषधोपचार करुन घेणे शक्य होत आहे”, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. भारतीय जन औषधी दिवस आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात […]