मुलचेरा: तालुक्यातील सुंदरनगर येथील नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये नुकतेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले,यावेळी अध्यक्षस्थानी तहसीलदार चेतन पाटील,उदघाटक सरपंच जया मंडल, तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, गटशिक्षणाधिकारी नेताजी मेश्राम,माजी जि प सदस्य रवींद्र शहा, ग्रामपंचायत सदस्य श्यामल पाल, निकुले सर,श्री व्ही. के. निखुले, प्राचार्य नेताजी शुभाषचंद्र माध्य. तथा उच्च माध्य. विद्यालय सुंदरनगर,कविता साना,मधुसूदन गाईन,केंद्रप्रमुख महेश मुक्कावार,देवनाथ बोबाटे, कोमरेवार, नीखाडे,गट समन्वयक श्रीकोंडावार,आदी उपस्थित होते.
याप्रसंगी तहसीलदार चेतन पाटील यांनी विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर जिल्ह्याचे नाव लौकिक करावे असे आवाहन केले.
प्रदर्शनात तालुक्यातील उच्च प्राथमिक खुला गट, माध्यमिक खुला गट ,आदिवासी गट, शैक्षणिक साहित्य गटातून, प्रयोगशाळा परिचर गट असे एकूण ९८ मॉडेल्सची मांडणी करण्यात आली होती.याठिकाणी तालुक्यातील विविध विद्यालयांतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन बघण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
दोन दिवस चाललेल्या विज्ञान प्रदर्शनीचे प्राचार्य लोनबले,प्रा.मेश्राम, प्रा.दुधबळे, प्रा.जया रोखडे,प्रा.शनिवारे,प्रा.अशोक शेंडे यांनी मूल्यांकन केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयातील पर्यवेक्षक सुनील वांढरे प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.