ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवून घेणे बंधनकारक तहसिलदार चेतन पाटील

२६ जानेवारी च्या उपलक्षावर तहसिल कार्यालय मुलचेरा च्या सभागृहात  फार्मर आय डी बनवून देण्याचे कॅम्प आयोजन करण्यात आले आहे मोठ्या संखेने शेतकरी उपस्थित राहावे

मुलचेरा :- सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी बनवून घेणे बंधनकारक तहसिलदार चेतन पाटील

 

राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या फार्मर आयडी (अॅग्रिस्टॅक) प्रकल्पाचा तालुक्यात प्रजासत्ताक दिनी शुभारंभ करण्यात येणार आहे.

 

एकाच वेळी सर्व गावातून या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. कृषी संलग्न विभागाच्या योजना सुलभ, पारदर्शक पद्धतीने राबवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी ही अॅग्रिस्टॅक योजना महत्त्वाची ठरणार आहे.

 

 

शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीला (सातबारा उतारा) जोडण्यात येणार आहे.

 

त्या आधारे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) शेतकऱ्यांना प्रदान करण्यात येणार आहे. उच्च गुणवत्तेचा डेटा व अॅग्रिस्टॅकद्वारे कृषी उत्पादने आणि सेवामध्ये नवकल्पना वाढवण्याचा प्रयत्न आहे.

 

फार्मर आयडीचे फायदे

१) पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी फायदा होईल.

२) किसान योजनेतील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी आयडी वापरता येईल.

३) पिकासाठी कर्ज, किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड आदी शेती विकासाची कर्जासाठी वापर होईल.

४) पीकविमा तसेच आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत नुकसान भरपाईसाठी मिळविण्यासाठी आयडीचा वापर करता येणार आहे.

५) किमान आधारभूत किमतीवर शेतमाल खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी फायदा होईल.

६) शेतकऱ्यांना बाजारपेठेची माहिती, कृषी निविष्ठा, विपणन, तज्ज्ञांचे मार्गदर्शनासाठी या आयडीचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

 

शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेली ही योजना आहे. फार्मर आयडी तयार करण्यासाठी आवश्यक ती माहिती स्थानिक पातळीवर देण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा.