ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम साहेबांचे आभार मानावे तेवढे कमीच

अतिव दुखाःत होतो मायेचा स्पर्श!

मृतदेह जपणुक करायला पुर्ण अहेरी ऊपविभागात साधन नव्हते.एवढ्या मोठ्या परिसरात केवळ एकच शितशवपेटी एका सामाजीक संस्थेकडे होती.

*मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम* साहेबांना अडचण माहीत होती परंतु योग्य संस्थेला देण्याचा त्यांचा मानस होता.अहेरी ऊपविभागात समाजकार्यात अग्रेसर असलेल्या *टायगर ग्रुपला* शितपेटी प्रदान करण्यात आली.टायगर ग्रुप मार्फत ही सेवा अविरत सुरु आहे.केवळ आलापल्लीच नव्हे तर परजिल्ह्यातील गोंडपिंपरी तसेच परराज्यातील बेजुर- गुडेम या गावातही सेवा पुरविण्यात आली.दुःःखाच्या क्षणी मायेचा फुंकर घालण्याचे सत्कार्य आज टायगर ग्रुप करत आहे.कार्यक्षेत्र मोठे असल्याने एक शितपटी पुरेशी होत नसल्याने *टायगर ग्रुपने* स्वखर्चातुन नव्याने शितपेटी खरेदी केली.आलापल्लीत निःशुल्क सेवा देण्यात येत आहे.