विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली, महाराष्ट्रात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या साडे चार हजार जागांवर भरती करण्यात येणार, तसेच ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या माध्यमातून पार पडणार असल्याचेही सांगितले.
पहा काय म्हणाले वैद्यकीय मंत्री
एमपीएससीच्या माध्यमातून डाॅक्टरांच्या 300 जागा भरल्या गेल्या असून,सध्या 28 टक्के पदे रिक्त आहेत,तसेच भरतीसाठी आम्ही मेडिकल बोर्ड तयार करुन त्या माध्यमातून लवकरच पदभरती केली जाईल.
तसेच आतापर्यंत 10 टक्के हॉस्पिटल आणि 90 टक्के हाफकिन, अशी औषध खरेदी केली जात होती, परंतु आता हे प्रमाण बदलणार आहे, आता 30 टक्के हॉस्पिटल आणि 70 टक्के हाफकिन अशा प्रमाणात औषधे खरेदी केली जाणार असे महाजन यांनी सांगितले.
