ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

केंद्र सरकारचा मोठा निर्णय आता पुढील एक वर्ष रेशन मोफत मिळणार

केंद्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. 2023 मध्ये आता एक वर्ष फुकट रेशन मिळणार आहे. 81.35 कोटी लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदे अंतर्गत मोफत अन्नधान्य पुरवठा होणार आहे. 

मंत्रिमंडळाच्या या निर्णय एन एफ एस ए अंतर्गत अन्नधान्यावर अनुदान देण्याकरता केंद्र सरकार पुढील एक वर्षासाठी दोन कोटी रुपये खर्च करणार आहे अशी माहिती पियुष गोयल यांनी दिली. हा निर्णय एक ऐतिहासिक निर्णय असून पंतप्रधानांची गरिबां प्रति संवेदना व्यक्त करणारा निर्णय आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत, केंद्रशासन ८१.३५ कोटी रेशन लाभार्थ्यांना पुढील एक वर्षासाठी म्हणजेच एक जानेवारी 2023 पासून मोफत धान्य पुरवठा करणार आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. Free ration Yojana Maharashtra

1 year free ration Yojana एन एफ एस ए अंतर्गत केंद्र सरकार आणि इतर कल्याणकारी योजनाच्या अनुदानापोटी दोन कोटी लाखापेक्षा अधिक निधी या योजनेसाठी खर्च करणार आहे. या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे गरिबांचा आर्थिक तणाव कमी होणार आहे तसेच त्यांना दिलासा मिळेल असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे. असे त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

केंद्र शासनाचा मोठा निर्णय 

वरील निर्णय हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय असून, या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरिबां प्रति संवेदनशीलता दर्शवणारा ऐतिहासिक निर्णय आहे असे पियुष गोयल यांनी यावेळी म्हटले आहे. प्रत्येक घरांमधील लाभार्थ्यांना या योजनेतून प्रति लाभार्थी पाच किलो धान्य मोफत दिले जाईल तसेच अंतोदय अन्न योजनेअंतर्गत 35 किलो धान्य (ration Yojana Maharashtra) प्रति कुटुंब एक वर्षासाठी मोफत दिले जाईल.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने मधून अनुदानित अन्नधान्य तीन रुपये प्रति किलो तांदूळ, दोन रुपये प्रति किलो गहू तसेच एक रुपये प्रति किलो भरड असे धान्य लाभार्थ्यांना वितरित केले गेले आहे.  पियुष गोयल यांनी लाभार्थ्यांना यापुढेही मोफत धान्य मिळणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे असे सांगितले.

कोरोनाच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना मधून 28 महिने मोफत धान्य वितरित करण्यात आले अशी माहिती ही पियुष गोयल यांनी यावेळी दिली.