ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अर्थशास्त्राचे रहस्य उलगडणारे पुस्तक ‘टेम्पल इकोनॉमिक्स’ प्रकाशित

मंदिरांच्या चार भिंतीत दडलेल्या अर्थशास्त्राचे रहस्य उलगडणारे पुस्तक मुंबई विद्यपीठात प्रकाशित करण्यात आले. ‘Temple Economics’ ‘टेम्पल इकॉनॉमिक्स’ या पुस्तकाद्वारे भारतातील जिल्ह्यांचा अभ्यास करून लेखक संदीप सिंह यांनी मंदिराकडे पाहण्याच्या द़ृष्टिकोनात वृद्धी केली.

या प्रकाशन सोहळ्यात ‘Temple Economics’ ‘टेम्पल इकॉनॉमिक्स’च्या दोन खंडांचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाचे उपकुलपती रवींद्र कुळकर्णी, चॉईस इंटरनॅशनलचे प्रबंध संचालक कमल पोद्दार, लेखक संदीप सिंह आणि भाजपाच्या आंतरराष्ट्रीय कामकाज कार्यकारिणीचे सदस्य विजय चौथाईवाले यांच्या हस्ते झाले. पहिल्या खंडाविषयी लेखक म्हणाले, कोरोना काळात राज्य किंवा केंद्र सरकारला पैशाची कमतरता नसतानादेखील मंदिरातल्या पैशाचा वापर करावा, असा सल्ला दिला जात होता. त्यामुळे नेमकेपणाने ही मंदिरे काय अर्थशास्त्र चालवतात, यावर माझ्या डोक्यात विचारचक‘ सुरू झाले. हे प्रश्न माझ्यासाठी प्रेरणा आणि शोधाचे कारण बनले.

 

 

‘Temple Economics’ : मी हे पुस्तक लिहिताना जेवढा शोध घेत गेलो तेवढे साहित्य हाती लागत गेले. या पुस्तकातून मी भारतीयांनी हे मंदिरांचे वैभव जपण्यासाठी ‘ए डिकेड फॉर मंदिर्स’ हे नाव देऊन आवाहनच केले आहे. तुम्ही एक दशक मंदिरात किमान घंटा वाजविण्यासाठी गेलात तरी, मंदिराचे वैभव टिकविण्याचे यात सामर्थ्य आहे, असे दुसरा खंड ‘ए डिकेड फॉर मंदिर्स’विषयी संदीप सिंह यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाचे उपकुलपती डॉ. रवींद्र कुळकर्णी यांनी, मुंबई विद्यापीठात नवीनच सुरू होणार्‍या टेम्पल मॅनेजमेंट या एमबीए कोर्सची छोटेखानी ओळख करून दिली. या कोर्सच्या मदतीने विद्यार्थ्यांना अवाढव्य अशा मंदिरांच्या अर्थशास्त्राचे शिक्षण सोबतच मंदिरांच्या व्यवस्थापनाबाबत शिक्षण देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.