माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री मा.राजे अंम्ब्रिशराव महाराज यांनी येल्ला (रेगुंठा) येथील शंकर नरसिंगेजी यांच्या कुटुंबाला केली आर्थिक मदत
गडचिरोली- जिल्ह्यातील सिरोंच्या तालुक्यातील स्थानिक येल्ला (रेगुंठा) येथील रहवासी असलेले शंकर नरसिंगेजी हे काही दिवसापासून गळ्यात फोडे झाल्याने या आजाराने ग्रस्त होते आणि त्यांना उपचारासाठी मंचिराल( तेलंगणा) येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी शास्त्रक्रिया करण्यासाठी सांगितले आणि या उपचारासाठी खर्च मोठ्या रकमेचा असल्याने त्यांच्या कुटुंबात खूप मोठी आर्थिक अडचण या परिवारावर आली होती.पण ही बाब मा.राजे अंम्ब्रिशराव महाराज यांना लक्षात येताच त्यांनी शंकर नरसिंगेजी यांच्या कुटुंबाला 15000/- रुपयांची आर्थिक मदत केली.त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आधार झाला,आणि तसेच शंकर नरसिंगेजी यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी पुन्हा मदत करण्याच आश्वासन सुध्दा राजे अंम्ब्रिशराव महाराज यांनी दिल.विशेष बाब म्हणजे अहेरी इस्टेट चे दानशूर राजे अंम्ब्रिशराव महाराज हे अनेकदा आपल्या दानवीर स्वभावाने आपल्या क्षेत्रातील जनतेला रोगाने ग्रासलेल्या,अडी-अडचणीत, संकटात सर्वोपरी मदत करीत असतात आणि त्यांनी आतापर्यंत अनेक गरजु लोकांना आर्थिक मदत केली आहे,यावेळी ही मदत रविभाऊ जोरीगलवार (राजे फोटोग्राफर)यांच्या हस्ते देण्यात आली त्यावेळी शंकर नरसिंगेजी यांच्या कुटुंबातील सदस्य आणि येल्ला (रेगुंठा) येथील गावकरी उपस्थित होते.