एटापल्ली:तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल गेदा येथे सुसज्ज समाज मंदिर बांधकाम केले जाणार असून 3 फेब्रुवारी रोजी माजी जि प अध्यक्ष तथा राष्ट्रवादीच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.
गेदा येथील नागरिकांनी भाग्यश्री ताई आत्राम यांच्याकडे गावात समाज मंदिर बांधकाम करण्याची मागणी केली होती.गावातील नागरिकांची मागणी लक्षात घेता ताईंनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे ही मागणी रेठून धरले.अखेर मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी या कामासाठी मोठी निधी उपलब्ध करून दिली असून नुकतेच भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी माजी प स सभापती बेबी नरोटी,राकॉ चे कार्याध्यक्ष संभा हिचामी,येमली सरपंच ललिता मडावी,ग्रा प सदस्य अजय पदा, लक्ष्मण नरोटे,नगर पंचायतचे गटनेता जितेंद्र टिकले,पोलीस पाटील मुकेश पदा,भूमिया दसरु पदा, पुजारी कोकू कुंदामी,रामाजी लटारे,वसंत भांडेकर, परशुराम वैरागडे,अविनाश सुरजागडे, शिवराम गव्हारे, कंदरू पदा आदी मान्यवर उपस्थित होते.