मुलचेरा- मागील दोन दिवसापासून तालुक्यात चालू असलेल्या सततधांर पाऊसामुळे दिनांक 21जुलै ला देवदा- रेगडी मुख्य रस्त्यावर एक मोठे झाड पडून वाहतूक काही काळासाठी प्रभावित झाली होती. ही बाब आपल्या महसूल विभागाच्या पथकासोबत अतिवृष्टिग्रस्त भागात दौऱ्यावर असलेल्या मुलचेऱ्याचे तहसिलदर चेतन पाटील यांना कळताचं त्यांनी तात्काळ आपल्या महसूल विभागाचे पथक व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने झाड बाजूला हटवून रस्ता पूर्ववत वाहतुकीसाठी चालू केला. याप्रसंगी मंडळ अधिकारी अरुण नागरगोजे, तलाठी प्रशांत मेश्राम, महसुल सहाय्यक हितेश लांजेवार उपस्थित होते.
Related Articles
‘दिलखुलास’ कार्यक्रमात नगर रचना संचालक प्रतिभा भदाणे यांची दि. २०, २१ व २३ जानेवारी रोजी मुलाखत
मुंबई, दि. १९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नगर विकासच्या सहसचिव तथा संचालक, नगररचना प्रतिभा भदाणे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार दि. २०, शनिवार दि. २१ व सोमवार दि. २३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते […]
नवनियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वर्षभरात ७५ हजार शासकीय नोकऱ्या उपलब्ध करणार : राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यात प्रतिपादन मुंबई, दि. 3 :- रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्तीपत्र मिळालेल्या राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुखपणे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केल्यानुसार येत्या वर्षभरात राज्यात 75 हजार नोकऱ्या उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यस्तरीय […]
पिंपरी चिंचवड येथील क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी ४१ कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.२०- पिंपरी चिंचवड येथे साकारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी चापेकर बंधूंचे स्मारक पूर्ण करण्यासाठी ४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते . बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महापालिकेचे […]