शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा 2011 मध्ये सुधारणा केली आहे. आता पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षेचा पर्याय विद्यार्थ्याला देण्यात आला आहे. पुनर्परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना त्याच वर्गात बसावं लागणार आहे.
