गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

मूलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली येथील शैता मेसा मंनो यांच्या कुटूंबाला मिळाला आधार

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून आर्थिक मदत..!!

गडचिरोली जिल्ह्याचे विकास पुरुष आणि दानशूर राजे म्हणून सुपरिचित असणारे व्यक्तिमत्व अहेरी इस्टेटचे राजे व माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या क्षेत्रातील जनतेला नेहमीच मदतीचा हात देत असतात आणि आपल्या अहेरी मतदार संघातील गरीब व रोगाने ग्रासलेल्या आणि अडी-अडचणीत असलेल्या जनतेला नेहमीच आर्थिक मदत करीत असतात,त्यांनी आज सुध्दा मूलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या बोलेपल्ली येथील रहिवासी असलेली श्रीमती.शैता मेसा मंनो ही महिला काही दिवसापूर्वी आपल्या शेतातून परत आपल्या घरी येत असताना गावा लगत असलेली नदी पार करत असताना तोल गेल्याने ती महिला नदीत वाहून गेली,गावातील लोकांनी तिला बाहेर काढले असता तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने,पुढील कार्य करण्यासाठी अडचण निर्माण झाली,पण ही मंनो कुटुंबाची आर्थिक समस्या राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या पर्यंत कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिली.त्यावेळी राजे साहेबांनी मंनो कुटूंबाला 10,000(दहा हजार) रुपये कार्यकर्त्यांच्या हस्ते पाठवुन आर्थिक मदत केली.शासनाच्या कल्याणकारी योजना मंनो कुटूंबाला मिळतील आणि मंनो कुटूंबाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन कार्यकर्ते यांच्या माध्यमातून दिली.

त्यावेळी नगरसेवक दिलीप आत्राम, युवा नेते गणेश गारघाटे,जेष्ठ कार्यकर्ते परशुरामजी भोयर,प्राध्यापक प्रवीण कुमरे,ग्रामपंचायत सदस्य अक्षय चुधरी,बोलेपल्ली ग्रामपंचायत सदस्य सीताराम पल्लो,गाव पाटील मनोहर तिम्मा,गाव भूमिया मत्सरी झोरी,सामजिक कार्यकर्ते बाजीराव मडावी,गुरुदास मंनो,देवाजी मंनो,मेसा मंनो आणि बोलेपल्ली येथील गावकरी उपस्थित होते.!