ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या करंचा येथील शंकर लिंगा सिडाम यांच्या कुटुंबाला मिळाला आधार

अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी दिला मदतीचा हात

अहेरी तालुक्यातील करंचा येथील स्थानिक रहिवासी श्री.शंकर लिंगा सिडाम वय-40 वर्षे हे आपल्या घरच्या बैलांना जंगलात नेहमी चरण्यासाठी घेऊन  जात असत.ते काल सुध्दा नेहमी प्रमाणे जंगलात बैलांना घेऊन गेले असता.नकळत पणे एका अस्वलाने शंकर लिंगा सिडाम यांच्या वरती हल्ला केला त्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.
त्या अवस्थेत गावातील गावकऱ्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय अहेरी येथे भरती केले पण त्यांची प्रकृती अत्यंत  चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर येथे डॉक्टरांनी नेण्यास सांगितले.पण 108 ची रुग्णवाहिका रुग्णालयात उपलब्ध नसल्याने आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने त्यांचं कुटूंब चिंतेत पडलं होत.
पण ही बाब कार्यकर्त्यांनी अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या लक्षात आणून दिली.त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले कार्यकर्ते विनोद जिल्लेवार व विकास तोडसाम यांना पाठवून शंकर लिंगा सिडाम यांच्या कुटूंबाला मदतीचा हात दिला.
आणि त्याच्यासाठी 102 ची रुग्णवाहिका कार्यकर्त्यांनी उपलब्ध करून दिली व त्या 102 रुग्णवाहिकेत 3000 रुपयाचे डिझेल टाकून दिलं आणि शंकर लिंगा सिडाम यांच्या कुटूंबाला आधार देत आर्थिक मदत केली.
आपण सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करण्याचे आश्वासन सुध्दा यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिल.
त्यावेळी विकास तोडसाम,विनोद जिल्लेवार करंचा येथील गावकरी व शंकर लिंगा सिडाम यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होत.