ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी पालकमंत्री श्रीमंत राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते प्रसिद्ध पंढरपुरी चाय चे शुभारंभ

श्रीराम जन्मभूमी येथील मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर शुभारंभ

*अहेरी*:- येथील आझाद चौकात प्रसिद्ध पंढरपुरी चाय कॅफे चा उद्घाटन श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील भव्य नवनिर्माण मंदिरातील मूर्तीचे प्राणप्रतिष्ठाच्या शुभ मुहूर्ता च्या दिवशी माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्रीमंत राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा च्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच चाय प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                अहेरीमध्ये सुरुवात करण्यात आलेला पंढरपुरी चहा कॅफे त्याच्या चवीसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही मसाल्यांनी समृद्ध महाराष्ट्राच्या खास पंढरपुरी चहाचा आस्वाद घेऊ शकता. या चहाची चव घ्यायची असेल तर इथे यायलाच हवे. महाराष्ट्र चहाचे फार कमी ठिकाणी सापडेल आणि त्यापैकी एक म्हणजे अहेरितील पंढरपुरी चाय कॅफे. येथे तुम्हाला महाराष्ट्रातील पंढरपुरी मसाल्याचा खास चहा खाण्याची संधी मिळेल.

 पंढरपुरी चहा अहेरीच्या मेनरोडवरील आझाद चौकात असलेल्या पंढरपुरी कॅफेमध्ये उपलब्ध आहे. या कॅफेच्या मालक राहुल शंकर अनलवार असून त्यांचे वडील शंकर अनलवार यांचे प्रसिद्ध नमो चाय सुद्धा त्याच चौकात आहेभे विशेष.

 अहेरीतील लोक इथे येऊन या चहाचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत. महाराष्ट्राचा खास पंढरपुरी चहा शुगर आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे, त्यामुळे या चहाचा आस्वाद सहज घेता येतो, असे सांगितले जाते.