मुलचेरा:-इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल हे पूर्व तय्यारीने पडावे, त्याची चांगली पूर्व तय्यारी व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासन, SCERT, PRATHAM FOUNDATION, DIET, यांचे संयुक्त विद्यमानाने शाळा पूर्व तय्यारी अभियानचे अंतर्गत पहिले पाऊल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत मुलचेरा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 68 शाळांमध्ये शाळास्तरावर पहिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेलाव्या पूर्वी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. शैक्षणिक घोषवाक्यानी गावातील वातावरण आनंदमय झाले. यात भरतीपात्र विद्यार्थी, शालेय विद्यार्थी,माता पालक, गावातील नागरीक, स्वयंसेवक, लीडर माता, SMC सदस्य, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, शाळेतील शिक्षक यांनी सहभाग नोंदविला. मुलचेरा तालुक्यातील जवळपास 612 भरतीपात्र बालकांची या मेळाव्यात नोंदणी करण्यात येणार आली. मेळाव्यात विविध क्षमता तपासण्या करीता सात स्टॉल लावण्यात आले.
यावर विविध साहित्यांच्या मदतीने बालकांच्या क्षमता तपासण्यात आल्या. त्याच्या नोंदी विकासपत्रात घेऊन पुढील आठ आठवडे मुलांकडून करवून घ्यावयाच्या कृतींचे पाहिले पाऊल हे पुस्तक या प्रसंगी मातांना वितरित करण्यात आले. शाळा स्तर दुसऱ्या मेळाव्याचे आयोजन 27 जून 2023 रोजी करण्यात येणार आहे. मुलचेरा येथील मेळाव्यास तालुक्याचे गटशिक्षाधिकारी गौतम मेश्राम, यांनी भेट देऊन उपस्थित माता पालकांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे गट साधन केंद्रातील विषय साधणव्यक्ती, विषय तज्ज्ञ, केंद्र प्रमुख यांनी सुद्धा मेळाव्यास नियोजनाप्रमाणे भेट दिली.