मुलचेरा-: शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत लगाम येथे शहिद बिरसा मुंडा ज्युनिअर कॉलेज मध्ये दिनांक 11 तारखेला भव्य महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिराला उदघाटक म्हणून गडचिरोली – चिमूर लोकसभा निर्वांचान क्षेत्राचे खासदार श्री अशोकजी नेते, सह उदघाटक म्हणून अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री धर्मरावबाबा आत्राम, कार्यक्रमाचे अध्यक्ष चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी ऊत्तमराव तोडसाम, प्रमुख पाहुणे म्हणून मुलचेऱ्याचे तहसीलदार सर्वेश मेश्राम, परिवीक्षाधीन तहसीलदार करिष्मा चौधरी, संवर्ग विकास अधिकारी जुआरे, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील,गट शिक्षणअधिकारी गौतम मेश्राम,युवराज लाकडे कृषी अधिकारी पंचायत,लगाम चे सरपंच दिपक मडावी, चुटूगुंटा च्या सरपंचा साधना मडावी, येल्ला च्या सरपंचा सोयाम, कोठारीच्या रोशनी कुसनाके, शांतीग्रामा च्या सरपंचा अर्चना बैरागी आदी मान्यवर उपस्थित राहून शिबिराला मार्गदर्शन तसेच विविध प्रमाणपत्र शासकीय योजनेचे वितरण करणार आहेत. शिबिरात ग्रामीण रुग्णालय मुलचेरा, प्राथमिक आरोग्य केंद्र लगाम यांचे वतीने नागरिकांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कृषी विभाग, पंचायत समिती, वनविभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प, आदिवासी विकास विभाग,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना विभाग, पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार विभाग, निवडणूक विभाग, पशुवैधकीय विभाग, शिक्षण विभाग व इतर विभागामार्फत शिबिरस्थळी स्टाल लावून योजनेचा लाभ देण्याचे काम होणार आहे. करीता जास्तीत जास्त संख्येत नागरिकांनी शिबिरस्थळी येण्याचे करावे असे आव्हाहन मुलचेऱ्याचे तहसीलदार सर्वेश मेश्राम, लगाम माल चे तलाठी रितेश चिंदमवार, लगाम चक च्या तलाठी अनिता दुर्गे यांनी केले.
Related Articles
केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी भरती
Ministry of Home Affairs, Intelligence Bureau, IB Recruitment 2022 (IB Bharti 2022) for 1671 Security Assistant/Executive & Multi-Tasking Staff Posts. Security Assistant/Executive (SA/Exe) & Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) Examination 2022, Total: 1671 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Exe) 1521 2 मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) 150 Total 1671 शैक्षणिक पात्रता: पद […]
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींचा उपद्रव थांबविण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी उपाययोजना कराव्यात – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 29 : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जंगली हत्तींपासून नागरिकांचे आणि शेतीचे नुकसान होत आहे. हत्तींचा हा उपद्रव थांबविणे गरजेचे आहे. यासाठी पाळीव हत्तींच्या माध्यमातून त्यांना परतवून लावणे, हत्तींना मर्यादित जागेत बंदिस्त ठेवणे, यासाठी पश्चिम बंगालमधून प्रशिक्षित मनुष्यबळ मागविणे, कर्नाटकमधून हत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊ नयेत यासाठी बंदोबस्त करणे, घरे आणि शेतीची नुकसान भरपाई वाढवून मिळण्यासाठी प्रस्ताव […]
काश्मिरी विद्यार्थ्यांचा राज्यपालांशी संवाद
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक-युवतींनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला. नेहरू युवा केंद्र संघटन संस्थेतर्फे या मुंबई भेटीचे आयोजन करण्यात आले. काश्मीर हा भारतातील सर्वात सुंदर प्रदेश आहे व जीवनात एकदा तरी काश्मीरला भेट देण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाला […]