ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन वाटप

मुंबई, दि.17 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज महाविद्यालय तसेच विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या 20 दिव्यांग विद्यार्थ्यांना श्रवण मार्गदर्शन सुविधा असलेल्या मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले.

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड व नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ परसन्स विथ व्हिजुअल डिसेबिलिटीज (दिव्यांगजन), डेहराडून यांच्या वतीने सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अदीप योजनेअंतर्गत गरीब व गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना हे स्मार्ट फोन देण्यात आले. कार्यक्रमाला नॅबचे अध्यक्ष हेमंत टकले, मानद महासचिव आनंद आठलेकर, कार्यकारी संचालिका पल्लवी कदम तसेच डेहराडून येथील भूपिंदर राणा उपस्थित होते.