गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास यांच्या हस्ते मूलचेरा येथील धान खरेदी केंद्राचं उद्घाटन संपन्न..!! मूलचेरा (विवेकानंदपूर) येथे धान खरेदी कार्याला सुरुवात..!

माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास यांच्या हस्ते मूलचेरा येथील धान खरेदी केंद्राचं उद्घाटन संपन्न..!!

मूलचेरा (विवेकानंदपूर) येथे धान खरेदी कार्याला सुरुवात..!

मूलचेरा:- संत गजानन बहुद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्या. कोपरल्ली चेक अंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव मार्केटिंग फेडरेशन लि.मार्फत मूलचेरा येथील पंचायत समिती गोदाम येथे यंदाच्या खरीप हंगामातील धान खरेदी सुरु करण्यात आली आहे.

“आधारभूत किंमत खरेदी योजना सण 2023-24 ” या वर्षाची खरीप हंगाम धान खरेदी मूलचेरा (विवेकानंदपूर) येथे पंचायत समिती गोदाम मध्ये धान खरेदी सुरू झाल्याने समस्त शेतकरी बांधवांना सोयीस्कर झालं आहे.माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास यांच्या शुभ हस्ते खरेदी केंद्राचे उदघाटन करण्यात आली आहे. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केली.त्यावेळी तराजू ची पूजा करून धानाची मोजणी करून कार्यास सुरुवात झाली..!

यावेळी कोठारी ग्रामपंचायत उपसरपंच मनोज बंडावार,शिवसेना तालुका अध्यक्ष गौरव बाला, माजी सरपंच हरिपद पांडे,, ग्रामपंचायत सदस्य बादल शाह,बबलू शील,भाजप महामंत्री निखिल हलदर तसेच शेतकरी वर्ग,कार्यकर्ते,गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.