गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लोहखनिज प्रकल्पामुळे युवकांना रोजगार उपलब्ध होऊन विकासाला मिळणार चालना.

गडचिरोली जिल्ह्यातील महत्वाकांक्षी सुरजागड लोहखनिज प्रकल्पामूळे अनेक वर्षांपासून रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या येथील युवकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून कोनसरी येथे होत असलेल्या प्रकल्पामुळे रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या हाताला आता काम मिळणार आहे.
आतापर्यत गडचिरोली जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे,कारखाने नसल्याने जिल्ह्याचा औद्योगिक विकास रखडला होता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती असतानाही त्यावर आधारित प्रकल्प नसल्याने श्रीमंत जिल्ह्याच्या नशिबी गरिबी अशी परिस्थिती होती.
आता मात्र ,एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील लोहखनिजाचे उत्खनन होऊन कोनसरी येथे मोठा प्रकल्प उभा राहत असल्याने युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे..
राज्यशासनाची भूमिका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग उभा करून युवकांना रोजगार देण्यासाठी प्राथमिकता आहे असे वेळोवेळी स्पष्ट केले आहे.
जिल्हा नियोजन बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोनसरी येथील लोहपोलाद प्रकल्पासाठी 18000 कोटींची गुंतवणूक राहणार असल्याचे सांगितले आहे.त्यासोबत एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी लागणारी जागाही एम.आय डी सी ने उपलब्ध करून द्यावी असे निर्देश ही दिले आहेत.त्यामुळे राज्यशासनाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग उभारून येथील बेरोजगारी मिटवण्यासाठी अग्रेसर आहो अशीच भूमिका राहिली आहे.
लोहखनिजाच्या प्रकल्पामूळे जिल्ह्याच्या विकासात हातभार लागणार आहे.कुशल-अकुशल बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.सोबतच हजारो लोकांना प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष रित्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.लोहखनिजाची वाहतुकीसाठी भविष्यात रेलसेवा आल्याने या भागाचा कायापालट होण्याची शक्यता आहे.
सर्वाथाने जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे.चालक- गार्ड- क्रेन चालक- क्रशर चालक- कामगार अशी नियुक्ती पत्रे दिली येथील युवकांना दिली गेली आहेत विद्यमान मुख्यमंत्री तथा तत्कालीन पालकमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत खाण परिसरात रुग्णालय- प्रशिक्षण अकादमी आदी सुविधांची झाली सुरुवात करण्यात आली.

दक्षिण गडचिरोलीच्या एटापल्ली परिसरातील प्रशिक्षित युवक-युवतींना सुरजागड लोहखनिज प्रकल्पात नोकरी दिली गेल्याने या भागात रोजगार निर्मिती करून जलद विकास साधला जाईल, अशी सार्वत्रिक भावना व्यक्त होत आहे. उद्योगामुळे रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाल्याने जिल्ह्याची विकासाची दारे खुली होणार आहे