ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क मुख्य परीक्षेची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  १३ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या “महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१” या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका २३ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याची माहिती आयोगाने दिली आहे.

१३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा- २०२१ पेपर क्रमांक – २ (स्वतंत्र पेपर लिपिक-टंकलेखक)” (लिपिक-टंकलेखक, – दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय व उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय, गट-क) या परीक्षा झाल्या होत्या. संबंधित उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावर उत्तरतालिका पाहण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.