मुलचेरा:-
तालुक्यातील मूलचेरा नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या कोपरल्ली येथील प्रकाश गोंगले मागील बरेच दिवसापासून अतिशय गंभीर आजारा पासून ग्रस्त होते.आणि त्यांच्या उपचारासाठी साठी खर्च जास्त होणार होता,घरची परिस्थिती बिकट असल्याने उपचारासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता.ही माहिती कोपरल्ली ग्राम वासीयांना मिळाली त्यांनी सामूहिक रित्या आपापल्या परिस्थिती नुसार प्रकाश गोंगले या रोगाने ग्रस्त असलेल्या आपल्या स्थानिक व्यक्ती प्रकाश गोंगले यास आर्थिक मदत केली, यावेळी माजी नगरसेवक प्रमोद गुट्टेवार,सखाराम दिवटीवार, बंडू बरलावार,सुनील बावरे, कार्तिक गरतुलवार, महेश चौधरी आणि कोपरल्ली येथील गावातील उपस्थित होते.
