मुलचेरा :-
तालुक्यातील विवेकानंदपुर येथील रहिवासी असलेले किरण कालीपद कर्मकार वयाच्या १५ व्या वर्षात ज्वेलरीचे कामे करण्याकरिता कलकत्ता येथे गेले.त्यांनी परिपूर्ण कामे शिकून परत स्वगावी परतले त्यांनी आपल्या कार्यकाळात मन लावून शिकलेल्या कामाच्या अनुभवात मुलचेरा तालुक्यात विवेकानंदपुर येथे किरण ज्वेलर्स चे दुकान स्थापन केले.त्यांचे व्यवसाय सूरळीत चालत आहे आणि ते दानशूर सुधा आहे. कोविड-१९ च्या कालावधीत त्यांनी प्रधानमंत्री रीलीफ फंड मध्ये रक्कम दिले.त्यांना लहान पनापासून घरच्या बागेत फुलांची झाडे लावण्याची आवळ होती त्यांनी आपल्या वयाचा ६४ व्या वर्षात सौ लीला किरण कर्मकार हि त्यांची पत्नी असुन यांच्या सहकार्याने आपल्या घराच्या बागेत १५० च्या आधील विवध फुलांचे झाडे लावले.त्या फुल झाडांना आपल्या मुला प्रमाणे जपत असुन त्यांना वेळेवर पाणी खत देत असल्याने त्यांची वाढ झाली असुन बगीचा फुलांनी भरला आहे.