मुलचेरा::-तब्बल तीन वर्षापासून मुलचेरा येथे मुद्रांक विक्रेता नसल्याने तालुक्यातील नागरिकांना स्टॅम्प पेपर साठी अहेरी किंवा चामोर्शी येथे चकरा माराव्या लागले परिणामी आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले असून शासकीय कार्यालयांशी निगडित प्रतिज्ञापत्रे, संमतीपत्र आदी शासकीय कामकाजांसाठी कोर्ट फी, स्टॅम्प पेपरची नागरिकांसह विद्यार्थांना आवश्यकता असते. परंतु मुद्रांक विक्रेता नसल्याने स्टॅम्प पेपर साठी तालुक्यातील नागरिकांना दुसऱ्या तालुक्यात धाव घ्यावी लागत आहे.मुलचेरा तालुक्यातील नागरिकांना चामोर्शी किंवा अहेरी येथे जाऊन स्टॅम्प पेपर साठी रांगेत उभे राहावे लागत आहे.प्रशासनाने मुलचेरा येथे अधिकृत मुद्रांक विक्रेत्याची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.