येणारी दिवाळी नागरिकांसाठी गोड होणार आहे कारण काल म्हणजेच दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांमध्ये १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल मिळणार आहे.
वरील सर्व वस्तू केवळ १०० रुपयांमध्ये मिळणार आहे. प्रत्येक गावामध्ये स्वस्त धान्य दुकान असते यामध्ये नागरिकांना अत्यंत कमी दारामध्ये राशन दिले जाते.
यामध्ये अधून मधून शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात ज्यामध्ये कमी दारामध्ये शिधापत्रिका धारकांना विविध जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जाते.
केवळ १०० रुपयांमध्ये नागरिकांना १ किलो रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल या वस्तू मिळणार आहेत.
या वस्तूंचा संच दिवाळीपूर्वी नागरिकांना मिळणार आहे. जेणे करून त्यांची दिवाळी गोड होऊ शकेल.
शासनाकडून दिवाळी भेट 100 रुपयांमध्ये मिळणार जीवनावश्यक वस्तूंचा संच
दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
महाराष्ट्र राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना या योजनेचा याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येणार असून त्याचे वितरण ई-पॉस मशीन म्हणजेच प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.
यासाठी 513 कोटी 24 लाख एवढा खर्च येणार आहे या खर्चास देखील या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.
शासनाकडून दिवाळी भेट 100 रुपयांमध्ये स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडून मिळेल लाभ.
बऱ्याच नागरिकांना आपल्या गावातील स्वस्त धान्य दुकानामध्ये आपल्यासाठी किती धान्य मिळते हे माहित नसण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक नागरिक स्वस्त धान्य दुकानदारांना याविषयी माहिती न विचारता जेवढे धान्य दिले तेवढे घेवून जातात.
अनेक राशन दुकानामध्ये नागरिकांकडून काही पैसे घेतले जातात. याविषयी देखील नागरिकांनी सतर्क राहून याविषयी चौकशी करून आवश्यक असेल तर नियमानुसार पैसे देण्यास हरकत नाही.
मात्र शासनाकडून कसलेही शुल्क न आकारले जाता तरीदेखील स्वस्त धान्य दुकानदार शिधापत्रिका धारकांकडून शुल्क आकारतात. अशावेळी अशा स्वस्त धान्य दुकानदरांची तहसीलदार कार्यलयात तक्रार करता येते.
दिवाळी पूर्वी मिळणार हे संच KIT.
सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा, त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सादर यंत्रणेस दिल्या आहेत.
तर आता तुम्हाला देखील वरील संच केवळ १०० रुपयांमध्ये मिळणार आहे यामध्ये १ किलो रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल इत्यादी वस्तू मिळणार आहे.
अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा
शासनाच्या वतीने बऱ्याच कल्याणकारी योजना राबविल्या जातात मात्र याची माहितीच सामान्य नागरिकांना नसते. त्यामुळे नागरिकांनी वर्तमान पत्र किंवा शासनाचे विविध अधिकृत समाज माध्यम खाते तपासावे जेणे करून एखादी नवीन योजना आली असेल तर त्याविषयी त्यांना माहिती मिळू शकेल.
या संदर्भातील खालील काही प्रश्ने वाचा जेणे करून या योजना संदर्भातील अधिक माहिती चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळू शकते.
शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळेल.
१०० रुपयांमध्ये मिळणारा संच योजनेचा लाभ तुमच्या गावातील स्वस्त धान्य दुकानास भेट द्यावी.
१ किलो रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल इत्यादी वस्तू मिळणार आहे.