बँकेत लॉकर असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या 1 जानेवारी 2023 पासून बँकेतील लॉकरबाबतच्या नियमांत बदल होणार आहेत. ‘आरबीआय’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन लॉकर एग्रीमेंट 31 डिसेंबर 2022 पूर्वी करावे लागणार आहे.
लाॅकरबाबतचे नवे नियम..!!
बेकायदा लॉकरमध्ये एक्सेस झाल्यास, दिवस संपण्यापूर्वीच बँकांना ग्राहकांच्या नोंदणीकृत मेलवर, तसेच मोबाइलवर त्याची माहिती द्यावी लागेल.
बॅंकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरमधील कोणत्याही वस्तूचे नुकसान झाल्यास, बँकेला त्याची भरपाई द्यावी लागेल. आग, चोरी, दरोडा यांसारख्या घटना टाळण्याची जबाबदारी बँकांची आहे.
भूकंप, पूर, वादळ अशा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे लॉकरमधील साहित्याचं नुकसान झाल्यास, बँक त्याला जबाबदार नसेल. मात्र, अशा आपत्तीपासून बचावासाठी बॅंकेला उपाय करावे लागतील. ग्राहकांच्या स्वतःच्या चुकीमुळे नुकसान झाले, तरी बँक भरपाई देणार नाही.
खातेदाराचा मृत्यू झाल्यास, त्याने नॉमिनेट केलेल्या व्यक्तीला वस्तू काढण्याचे स्वातंत्र्य असेल. त्यासाठी मृत्यू प्रमाणपत्राची पडताळणी व व्यक्तीच्या ओळखीची पुष्टी केली जाईल.