ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

यंदा ‘या’ खेळाडूला मिळाला खेलरत्न; द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कारांचीही यादी जाहीर

केंद्रिय क्रिडा मंत्रालयाने काल (ता. 14 नोव्हेंबर) राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. विशेष गोष्ट अशी की यामध्ये एकाही क्रिकेटरला स्थान देण्यात आलेले नाही. येत्या 30 नोव्हेंबरला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार अचंत शरथ कमलला (2 दशकांपासून आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळणारा खेळाडू) मिळाला आहे तर रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूरचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य (जीवनगौरव) पुरस्कार मिळाला आहे.

 द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी प्रशिक्षकांसाठी): जीवनजोत सिंह तेजा (नेमबाजी), मोहम्मद अली कमर (बॉक्सिंग), सुमा सिद्धार्थ शिरूर (पॅरा शूटिंग), सुजीत मान (कुस्ती).

द्रोणाचार्य पुरस्कार (लाईफटाईम कॅटेगरी):दिनेश जवाहर लाड (क्रिकेट), बिमल प्रफुल्ल घोष (फुटबॉल), राज सिंह (कुस्ती).

ध्यानचंद पुरस्कार (जीवन गौरव) : अश्विनी अकुंजी सी (अ‍ॅथलेटिक्स), धर्मवीर सिंह (हॉकी), बी.सी. सुरेश (कबड्डी), नीर बहादुर गुरुंग (पॅरा अ‍ॅथलेटिक्स). अर्जुन पुरस्कार: बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय आणि लक्ष्य सेन (बॅडमिंटन), अंशु आणि सरिता (कुस्ती), सीमा पुनिया व एल्डोस पॉल आणि अविनाश साबळे (ॲथलेटिक्स), अमित आणि निखत जरीन (बॉक्सिंग), श्रीजा अकुला (टेबल टेनिस), तरुण ढिल्लन आणि मानसी गिरीशचंद्र जोशी (पॅरा बॅडमिंटन), इलावेनिल वलारिवन व ओमप्रकाश मिथरवाल (शूटिंग), भक्ति प्रदीप कुलकर्णी आणि आर प्रज्ञानानंद (बुद्धिबळ), दीप ग्रेस एक्का (हॉकी), सुशीला देवी (जूडो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉन बॉल), सागर कैलास ओवलकर (मल्लखांब), विकास ठाकुर (वेट लिफ्टिंग), परवीन (वुशु), स्वप्निल संजय पाटिल (पॅरा स्विमिंग), जेरलिन अनिका जे (डेफ बॅडमिंटन).