राज्यभरातील पैलवानांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार यंदा पुणे जिल्ह्यातील भूगावमध्ये रंगणार आहे. कुस्ती स्पर्धा यंदा 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली. असून यंदाही विजेत्या पैलवानांना महिंद्रा थार जीप, ट्रॅक्टर आणि रोख बक्षीसांचा वर्षाव होणार आहे.
समारोपाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आणि उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होईल.
तर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये साधारण 50 हजार प्रेक्षक क्षमता असलेले स्टेडियम उभारण्यात आलं आहे. शाळेचे संस्थापक दीपक पायगुडे यांनी स्टेडियमच्या व्यवस्थितसाठी सहकार्य केले आहे.